---Advertisement---

…म्हणून केन विलियम्सन खेळणार नाही आज होणारा चौथा टी२० सामना

On: शुक्रवार, जानेवारी 31, 2020 11:57 AM
---Advertisement---

आज(31 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात चौथा टी20 सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सुरु होणार आहे. मात्र या सामन्याआधीच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा नियमित कर्णधार केन विलियम्सन या सामन्यातून बाहेर पडला आहे.

त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याला या सामन्यातून बाहेर जावे लागले आहे. त्याला ही दुखापत तिसऱ्या टी20 सामन्यावेळी झाली आहे. त्याच्याऐवजी वेगवान गोलंदाज टीम साऊथी न्यूझीलंड संघाचे आज नेतृत्व करणार आहे.

विलियम्सनने या टी20 मालिके 2 अर्धशतके झळकावली आहेत. तसेच तो या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. मात्र आता त्याला आजच्या सामन्याला मुकावे लागले आहे.

या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिल्या तीनही सामन्यात पराभव स्विकारल्याने न्यूझीलंडला आधीच मालिका गमवावी लागली आहे. आता त्यांना चौथ्या आणि पाचवा सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---