शुक्रवार (दि. 22 सप्टेंबर) हा दिवस 140 कोटी भारतीयांसाठी खूपच खास होता. कारण, याच दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खिशात घातला. हा सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला. या विशेष म्हणजे, पहिल्या दोन सामन्यात केएल राहुल याच्याकडे कर्णधारपद सोपवले गेले आहे. तिसऱ्या वनडेत रोहित शर्मा याच्यासोबत इतर वरिष्ठ खेळाडूही संघात परततील. यावेळी राहुलने कर्णधारपदाला साजेशी खेळी साकारत भारताला विजय मिळवून दिला. या शानदार विजयानंतर केएल राहुलची मोठी प्रतिक्रिया समोर आली. त्याने आपल्या नेतृत्वाविषयीच्या प्रश्नावर मोठे विधान केले.
काय म्हणाला राहुल?
केएल राहुल (KL Rahul) याला सामन्यानंतर विचारण्यात आले की, दीर्घ काळानंतर कर्णधाराच्या रूपात तुमचे पुनरागमन झाले आहे. यावर राहुल म्हणाला, “ही पहिली वेळ नाहीये, माझ्यासोबत नेहमीच असे होते. मला याची सवय आहे आणि मला हे आवडते.” यावेळी त्याने मोहाली मैदानातील उष्णतेविषयीही चर्चा केली. यामुळे भारतीय संघाचे खेळाडूही चिंतेत दिसले.
राहुल म्हणाला, “दुपारी जास्त गरम होत होते. मात्र, सुरुवातीला आम्हाला हे कोलंबोनंतर स्वर्गाप्रमाणे वाटले. मात्र, दुपारच्या उकाड्याने आम्हाला त्रास दिला. तरीही खेळाडूंनी जे समर्पण दाखवले, ते कौतुकास्पद आहे. आम्ही फक्त 5 गोलंदाज खेळवले. त्यामुळे त्यांना 10 षटके टाकावी लागली. उकाड्यामुळे हे शारीरिकरीत्या आव्हानात्मक होऊन बसते. मात्र, आम्ही सर्वांनी आमच्या फिटनेसवर काम केले आहे आणि हे मैदानावरही दिसत आहे.”
सूर्यासोबत काय बोलला?
राहुल पुढे बोलताना म्हणाला, “आमच्यावर मधल्या षटकांमध्ये दबाव टाकला गेला. आम्ही चेंडूने वास्तवात चांगली सुरुवात केली, पण उकाड्यामुळे मधली षटके कठीण राहिली. आम्ही 50 षटकांपर्यंत वचनबद्ध राहण्याबाबत चर्चा केली. मी 50 षटकांपर्यंत यष्टीरक्षण केल्यानंतर एक कठीण स्थितीत पोहोचलो होतो. सुरुवातीला मधल्या फळीत फलंदाजांसाठी हे कठीण होते. मात्र, सूर्यासोबत चांगली भागीदारी केली. आम्ही चांगले क्रिकेट शॉट्स खेळण्याविषयी बोलत राहिलो. शुबमन बाद झाल्यानंतर सेट फलंदाजाला बाद करणे थोडे कठीण होते. आम्ही चांगले क्रिकेट शॉट्स लावण्यात, स्ट्राईट रोटेट करणे यांविषयी बोलत राहिलो. आम्हाला गोंधळून जायचे नव्हते. आम्ही नेहमीच बरोबरीत होतो. त्यामुळे आम्हाला आणखी चांगल्याप्रकारे हा सामना जिंकायचा होता.”
राहुलची खेळी
कर्णधार केएल राहुल (Captain KL Rahul) याने सामन्यादरम्यान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत 63 चेंडूत नाबाद 58 धावांची विजयी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 1 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. (captain kl rahul on indias victory said ind vs aus after colombo felt like heaven read)
हेही वाचा-
आयसीसी रँकिंगमध्ये भारताची एकहाती सत्ता! संघासह खेळाडूंही सर्वोत्तम स्थानांवर
टीम इंडियाने मारलं मोहालीच मैदान! वनडे रॅंकींगमध्येही केला ‘नंबर वन’वर कब्जा