भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (०६ ऑगस्ट) फ्लोरिडा येथे चौथ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजला ५९ धावांनी पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला आणि २० षटकात १९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात आव्हानाचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या संघाला १९.१ षटकात १३२ धावांवरच रोखले. या सामन्यादरम्यान आधीच त्रासलेल्या वेस्ट इंडिजच्या कर्णधार निकोलस पूरन याला भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंत याने छळले.
तर झाले असे की, भारताच्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून (West Indies vs India) कर्णधान पूरन (Nicholas Pooran) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने ८ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकार मारत आक्रमक सुरुवात केली होती. मात्र डावातील पाचव्या षटकात त्याच्या विस्फोटक खेळीवर पूर्णविराम लागला.
भारताकडून अक्षर पटेल (Axar Patel) डावातील पाचवे षटक टाकायला आला होता. त्याच्या षटकातील शेवटच्या अर्थात सहाव्या चेंडूवर पूरनने साधारण फटका मारला आणि तो त्वरित एक धाव घेण्यासाठी पळाला. मात्र पूरनने हा फटका इतक्या हलक्या हातांनी मारला होता की, चेंडू खेळपट्टीपासून जास्त दूर गेला नाही. तिथेच क्षेत्ररक्षण करायला उभा असलेल्या सॅमसनने (Sanju Samson) पटकन चेंडू पकडला आणि यष्टीरक्षक रिषभ पंतकडे फेकला.
Two of West Indies' best performers dismissed within minutes. Will the total prove too high now?
Watch all the action from the India tour of West Indies LIVE, exclusively on #FanCode 👉 https://t.co/RCdQk12YsM@BCCI @windiescricket #WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/GBAUfWtiBy
— FanCode (@FanCode) August 6, 2022
सॅमसनने चेंडू पकडल्याने पाहून नॉन स्ट्राईकरवर असलेल्या कायले मेयर्सने धाव घ्यायला नकार दिला. परिणामी चेंडू पंतच्या हातात येईपर्यंत पूरन खेळपट्टीच्या अर्ध्यातच राहिला. आता परत स्ट्राईकवर परतणे शक्य नाही आणि चेंडूही यष्टीरक्षक पंतच्या हातात असल्याचे पाहून पूरन जागीच थांबला. दुसरीकडे आपल्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या पंतने या परिस्थितीचा फायदा घेतला. त्याने मुद्दाम चेंडू यष्टीला मारलाच नाही आणि पूरनकडे (Nichoals Pooran Runout) एकटक पाहात राहिला.
अखेर सर्व खेळाडू विकेटचे सेलिब्रेशन करण्यासाठी पंतजवळ आले. कर्णधार रोहित शर्माही त्याच्याजवळ आला आणि त्याने चेंडू यष्टीला मार असा सल्ला पंतला दिला. त्यानंतर पंतने यष्ट्या उडवल्या. पंतच्या या मजेशीर कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा एकदा चक दे! भारतीय हॉकी संघही फायनलमध्ये; गोल्ड मेडलसाठी ठोकणार दावेदारी
वेस्ट इंडीज मोहिमही फत्ते! दणदणीत विजयासह टी२० मालिकाही टीम इंडियाच्या नावे
हे पहिल्यांदाच घडलं! भारतीय पोरींनी विजयासह केले मागचे हिशोब चुकते