ऑस्ट्रेलियाचा कसोटी सलामीवीर उस्मान ख्वाजा सध्या सतत चर्चेत असतो. उस्मान ख्वाजाला पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान गाझा पट्टीच्या समर्थनार्थ विशेष चिन्ह असलेले बूट घालायचे होते. मात्र, त्याला आयसीसीने मान्यता दिली नाही, त्यानंतर तो काळी पट्टी बांधून मैदानात उतरला. आता, बॉक्सिंग डे टेस्टच्या आधी, ख्वाजा कबुतरा आणि ऑलिव्हची शाखा असलेली बॅट आणि शूज घेऊन सराव करत होता. त्याला यासोबतच मैदानात यायचे होते पण यावेळीही आयसीसीने त्याला परवानगी दिली नाही. उस्मान ख्वाजाला आयसीसीचा पाठिंबा मिळाला नसला तरी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने त्याला पाठिंबा दिला आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेला पोहोचलेल्या पॅट कमिन्स (Pat Cummins) याने उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याच्या समर्थनार्थ मोठी गोष्ट सांगितली आहे. कमिन्स म्हणाला, “आम्ही उझी (उस्मान ख्वाजा) याला खरोखर पाठिंबा देतो. मला वाटते की, तो ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्याबद्दल तो आदरपूर्वक उभा राहतो. सर्व जन समान आहेत, मला त्याची पद्धत आक्षेपार्ह वाटत नाही. उस्मान ख्वाजाने हा जो प्रकारे केला आहे, त्यामुळे तो आपले डोके उंच ठेवू शकतो. त्यामुळे मला विश्वास आहे की, आयसीसीने म्हटले आहे की, ते त्याला मान्यता देणार नाहीत. आयसीसी जे नियम बनवते ते तुम्हाला स्वीकारावे लागतात.”
सराव करताना उस्मान ख्वाजा आपल्या उजव्या बुटावर कबुतरा आणि ऑलिव्ह फांदीचे चिन्ह घेऊन सरावासाठी आला होता, याचा अर्थ सर्व मानव मुक्त आहेत आणि प्रत्येकाला समान सन्मान आणि अधिकार आहेत.ख्वाजाच्या या प्रकाराला क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशननेही मान्यता दिली होती पण आयसीसीने पुन्हा परवानगी दिली नाही. (Captain Pat Cummins backs controversial Usman Khawaja says The rules the ICC makes)
हेही वाचा
IND vs SA: दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेपूर्वी रोहितचं मोठं विधान; म्हणाला, ‘मी खूप मेहनत केली आहे, मला काहीतरी…’,
विश्वचषकानंतर रोहितची पहिली पत्रकार परिषद; टी20 विश्वचषक खेळण्याचे दिले संकेत, म्हणाला, ‘जे काही माझ्यासमोर…’