---Advertisement---

अर्रर्र! ऑस्ट्रेलियाचा कर्णधारच पडला दुसऱ्या कसोटीतून बाहेर, आता नेतृत्व कोण करणार?

On: बुधवार, डिसेंबर 7, 2022 10:51 AM
Pat-Cummins
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज आणि कर्णधार पॅट कमिन्स याच्याबद्दल ही बातमी आहे. कमिन्स वेस्ट इंडिजविरुद्ध ऍडलेड येथे खेळल्या जाणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी स्कॉट बोलँड याला ऑस्ट्रेलिया संघात सामील करण्यात आले आहे. आता पॅट कमिन्सच्या जागी अनुभवी खेळाडू संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

स्टीव्ह स्मिथ करणार संघाचे नेतृत्व
दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या पॅट कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथ कर्णधार (Steve Smith Captain) बनला आहे. आता तो 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऍडलेड कसोटीत संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

पर्थ कसोटी सामन्यात पॅट कमिन्स (Pat Cummins) दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला दुसऱ्या डावातही गोलंदाजी करता आली नव्हती. या सामन्याच्या पहिल्या डावादरम्यान त्याच्या पायाच्या मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे तो गोलंदाजी करू शकला नाही. आता तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे आणि त्याच्या जागी स्कॉट बोलँड याला संघात सामील करण्यात आले आहे.

स्टीव्ह स्मिथ सलग दुसऱ्यांदा करणार दिवस-रात्र कसोटीत नेतृत्व
कमिन्स बाहेर पडल्यामुळे स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) सलग दुसऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात नेतृत्व करेल. मागील वर्षीही इंग्लंडविरुद्ध स्मिथने दिवस-रात्र कसोटीत नेतृत्व केले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी करत म्हटले की, कमिन्सला पूर्णत: फिट होण्यासाठी वेळ मिळाला नाही.

ऑस्ट्रेलियाचा विजय
कमिन्सची दुखापत पाहता ऑस्ट्रेलिया संघात वेगवान गोलंदाज लॉन्स मॉरिस आणि मायकल नीसर यांना घेतले गेले होते. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला पर्थ कसोटीत 164 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 4 विकेट्सच्या नुकसानीवर 598 धावा केल्या होत्या. संघाच्या दोन फलंदाजांनी द्विशतक झळकावले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघ 283 धावांवरच संपुष्टात आला होता. तसेच, ऑस्ट्रेलियाला जास्त धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सच्या नुकसानीवर 182 धावांवर डाव घोषित केला होता. तसेच, वेस्ट इंडिजपुढे 498 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, वेस्ट इंडिज संघाला 333 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना या सामन्यात पराभव पत्करावा लागला. (captain pat cummins ruled out from adelaide test steve smith will captain the side)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘काय तो सिक्स, काय तो भन्नाट कॅच’, आयसीसीने शेअर केलेला विराटचा व्हिडिओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल
विराटकडे संधीचं सोनं करण्याची वेळ! बांगलादेशविरुद्ध ‘हे’ दोन विक्रम करताच बनेल जगातील दुसरा खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---