आयपीएल 2024 चा क्वालिफायर 1 सामना मंगळवारी (21 मे) रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना केकेआरसमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात केकेआरने 13.4 षटकांत 2 गडी गमावून एकतर्फी विजय मिळवला. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूत 58 धावांची नाबाद खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. श्रेयस अय्यरच्या संघानं हा सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.
हैदराबादचा एकतर्फी पराभव झाल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, “हा दिवस आमच्यासाठी चांगला नव्हता.” हैदराबादनं या सामन्यात इम्पॅक्ट खेळाडूचा वापर देखील फलंदाजीच्या वेळेस केला. सामन्यानंतर कमिन्स म्हणाला, “होय, या पराभवाला आम्ही लवकरच विसरुन जावू. चांगली गोष्ट आहे की आम्ही क्वालिफायर 2 सामन्यात विजय मिळवू शकतो. टी20 क्रकेटमध्ये असे काही दिवस येतात, ज्यामध्ये फारशा गोष्टी काम करत नाहीत. आम्ही फलंदाजी करत असताना चांगला खेळ दाखवू शकलो नाही. जो आम्हाला हवा होता.”
पुढे बोलताना कमिन्स म्हणाला, “गोलंदाजी मध्ये आम्ही फारसा प्रभाव टाकू शकलो नाही. मला वाटलं की या विकेट वरती फलंदाजी जास्त महत्वाची होती. मला वाटतयं केकेआरने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. आम्ही सर्वांनी पुरेसे क्रिकेट खेळले आहे. आता नवीन ठिकाणी (चेन्नई) खेळण्यासाठी आम्हाला नक्कीच मदत होईल. त्यासाठी आम्हाला या पराभवाला मागे टाकून पुढे जावं लागेल. आणि चांगली कामगिरी करावी लागेल.”
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने केवळ 39 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर राहुल त्रिपाठीने 35 चेंडूत 55 धावा आणि हेनरिक क्लासेनने 21 चेंडूत 32 धावा करत संघाला 159 धावांपर्यंत पोहोचवले. केकेआरसाठी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने प्रभाव पाडत सर्वाधिक 3 बळी घेतले. केकेआरला अंतिम फेरीत पोहचवण्यासाठी त्यानं मोलाचे योगदान दिले.
महत्वाच्या बातम्या-
केकेआरची फायनलमध्ये धडक, पॅट कमिन्सच्या संघाचा दारुण पराभव
केकेआरचे 24.75 कोटी रुपये वसूल! मिचेल स्टार्कनं प्लेऑफमध्ये दाखवला त्याचा वर्ल्डकपमधील फॉर्म