Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेंगलोरविरुद्धचे ‘ते’ षटक दिल्ली कॅपिटल्सला पडले महागात; खुद्द कर्णधाराचा खुलासा

बेंगलोरविरुद्धचे 'ते' षटक दिल्ली कॅपिटल्सला पडले महागात; खुद्द कर्णधाराचा खुलासा

April 17, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Rishabh-Pant

Photo Courtesy: iplt20.com


शनिवारी (दि. १६ एप्रिल) वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आयपीएलच्या २७व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध १६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील पराभवानंतर दिल्लीने हंगामातील तिसऱ्या पराभवाचा सामना केला. या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने सामन्यादरम्यान महागात पडलेल्या षटकाबद्दल सांगितले आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) आतिषी अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीसमोर १९० धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि डेविड वॉर्नर (David Warner) यांनी शानदार सुरुवात करून देण्यास मदत केली.

ते षटक आमच्यासाठी गेम-चेंजर होते
“जस-जसा डाव पुढे सरकत गेला, खेळपट्टी तस-तशी आणखी चांगली झाली. मुस्तफिजूर रहमानचे (Mustafizur Rahman) ते षटक आमच्यासाठी गेमचेंजर होते. मला वाटते की, आम्ही आमच्या योजनेनुसार गोलंदाजी करू शकलो असतो. मात्र, ज्याप्रकारे दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात फलंदाजी केली, ती उल्लेखनीय होती,” असे पुढे बोलताना तो म्हणाला.

मुस्तफिजूर रहमानचे एक षटक पडले महागात
या पराभवानंतर कर्णधार रिषभ पंत म्हणाला की, त्याच्या संघाला मुस्तफिजूर रहमानचे एक षटक महागात पडले. डावाच्या १८व्या षटकात दिनेश कार्तिकने रहमानच्या ६ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने एकूण २८ धावा चोपल्या. त्यामुळे बेंगलोर संघ २० षटकात ५ विकेट्स गमावत १८९ धावांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

वॉर्नरने दिली विजयाची संधी
वॉर्नरच्या खेळीबद्दल पंत म्हणाला की, “डेविड वॉर्नरने चांगली फलंदाजी केली आणि आम्हाला विजय मिळवण्याची संधी दिली. मी मिचेल मार्शवर पराभवाचे खापर फोडणार नाही. हा त्याचा पहिला सामना होता आणि तो आपल्या लयीत दिसला नाही. हा खेळाचा भाग आहे.” खेळपट्टीबद्दल बोलताना तो म्हणाला, “त्यांनी जेव्हा खेळायला सुरुवात केली, तेव्हा खेळपट्टीमध्ये उसळी होती. सामन्यासोबतच खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली होत गेली. मुस्तफिजूर रहमानचे ते षटक आमच्यासाठी गेमचेंजर ठरले.”

या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी घसरला आहे. दिल्लीचे ४ गुण आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

लईच चोपलं राव! दिल्लीविरुद्ध एकाच षटकात दिनेश कार्तिकने पाडला धावांचा पाऊस; ‘ऑरेंज कॅप’धारी बटलरलाही पछाडलं

विराट बनला सुपरमॅन! हवेत झेप घेत एका हाताने पकडला पंतचा अफलातून कॅच; पाहून अनुष्काही झाली खुश

IPL2022| गुजरात वि. चेन्नई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!


ADVERTISEMENT
Next Post
Virat-Kohli-Aggressive-Celebration

ये हुई ना बात! जुना विराट परतला, वॉर्नर बाद झाल्यानंतर कोहलीचे आक्रमक सेलिब्रेशन पाहून सुखावले चाहते

Hardik-Pandya

हार्दिकच नाही, तर 'हे' ४ खेळाडूही करू शकतात टीम इंडियात कमबॅक; फक्त आयपीएलमध्ये केलाय धमाका

Rohit-Sharma

'अरे कमीत कमी आयपीएल कर्णधारपदाचा तरी राजीनामा दे', मुंबईच्या सलग ६ पराभवानंतर रोहितवर भडकले चाहते

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.