ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक 2022 (T20 World cup) स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर यासाठी भारतीय खेळाडू कसून तयारी करत आहे. तसेच यासाठी भारताचा चांगला सराव होण्याची शक्यता आहे, कारण भारत 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तसेच त्याने टी20 विश्वचषकात कोण सलामीला येणार हे पण स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याची पत्रकार परिषद झाली. यामध्ये त्याला टी20 विश्वचषकात विराट कोहली (Virat Kohli) ओपनिंग करू शकेल का, हे विचारले. या प्रश्नाचे त्याने उत्तर देताना रोहितने म्हटले, “विराटने सलामीला येताना अफगाणिस्तान विरुद्ध शतकी खेळी केली. तो टी20साठी एक चांगला खेळाडू आहे. तो सलामीसाठी योग्य पर्यायी खेळाडू आहे आणि हे आमच्या नेहमी लक्षात राहणार आहे. त्याने आयपीएलमध्ये सलामीला येताना उत्तम कामगिरी केली आहे.”
रोहितने टी20 विश्वचषकात कोण सलामीला येणार हे स्पष्ट केले आहे. त्याने म्हटले, “केएल राहुल हा त्याच्यासोबत सलामीला येणार आहे. त्याच्या प्रदर्शनावर कधी-कधी कोणाचे लक्ष जात नाही.”
केएल राहुल (KL Rahul) हा इंडियन प्रीमियर लीगनंतर (आयपीएल) थेट आशिया चषकात दिसला. यामध्ये त्याची कामगिरी निराशाजनक झाली असून त्याचा स्ट्राईक रेट 120च्या आसपास राहिला.
राहुल दुखापतीमुळे यावर्षी अनेक टी20 मालिकांना मुकला होता. मात्र तो आता पूर्णपणे फिट असून तो टी20 विश्वचषकात भारताचे उपकर्णधारपद सांभाळणार आहे. तर तो घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी20 मालिकांसाठी संघात आहे.
राहुलने भारतासाठी 2016पासून ते आतापर्यंत 61 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 57 डाव खेळताना 39.26च्या सरासरीने 1963 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 2 शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. यातील 43 सामन्यांमध्ये तो सलामीला आला असताना त्याने 1500च्या वर धावा पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-दक्षिण आफ्रिकेचा सामना धोक्यात! केरळच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमची लाईटच केली कट
काय सांगता, पीसीबीसाठी फुकटची हमाली करतात अध्यक्ष रमीज राजा! म्हटले, ‘घरच्यांची इच्छा नव्हतीच…’
‘नवा बोथम’ म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफविषयी १० रंजक गोष्टी






