---Advertisement---

मुंबई इंडियन्स फायनलमध्ये गेल्यानंतर रोहित शर्मा भलताच खुश, म्हणाला…

On: शुक्रवार, नोव्हेंबर 6, 2020 11:54 AM
---Advertisement---

आयपीएल 2020 ‘प्ले ऑफ’चा पहिला सामना अर्थात क्वालिफायर 1चा सामना गुरुवारी(5 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्य संघांमध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात मुंबईने दिल्लीला 57 धावांनी पराभूत केले आणि अंतिम सामन्यात धडक मारली. मुंबईने केलेल्या या प्रदर्शनानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मा प्रचंड खुश असून त्याने संघाचे कौतुक केले आहे.

गुरुवारी झालेल्या ‘क्वालिफायर 1’ मध्ये दिल्लीनं नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्या नंतर क्विंटन डी कॉक व सुर्यकुमार यादवने खेळ सांभाळला. मुंबईने 20 षटकांत 200 धावा उभ्या केल्या. यात डी कॉक 40, सुर्यकुमार यादव 51, ईशान किशन नाबाद 55, हार्दिक पांड्या नाबाद 37 धावांचे योगदान दिले.

दुसऱ्या डावात 201 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीच्या संघाने तीन गडी खाते न उघडताच गमावले. पण यानंतर मार्कस स्टॉयनीसने संघाचा मोर्चा संभाळला. त्याने 65 धावांची खेळी केली. तसेच अक्षर पटेलने 42 धावांची खेळी केली. मात्र त्यांच्याव्यतिरिक्त कोणालाही खास काही करता आले नाही. त्यामुळे दिल्लीने कशाबशा 20 षटकात 143 धावा केल्या.

आत्तापर्यंतचे सर्वोत्तम प्रदर्शन – रोहित शर्मा 

सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘माझे वाटते की हे आत्तापर्यंतचे आमचे सर्वोत्तम प्रदर्शन होते. आम्ही जिद्द दाखवली. दुसऱ्या षटकात विकेट गमावल्यानंतर डीकॉक आणि सूर्यकुमार यांनी ज्याप्रकारे फलंदाजी केली, ते कौतुकास्पद होते. आमची गोलंदाजीही शानदार राहिली.’

आम्ही परिस्थिती नुसार खेळलो – रोहित शर्मा

रोहितने म्हटले की, ‘आम्ही कधीही लक्ष्य डोक्यात ठेवले नव्हते. मी लवकर बाद झाल्यानंतर डी कॉक व सुर्यकुमारने मोर्चा सांभाळला. आमचा संघ हा समोर असलेली परिस्थिती पाहून बदल करून खेळत असतो. दरम्यान समोरच्या संघाचा खेळ आमच्या पेक्षा भारी आहे असा समज आम्ही कधीच करत नाही.’

ईशान किशन आहे फॉर्ममध्ये

रोहितने म्हटले की, “ईशान किशन या हंगामात चांगल्या लयीत आहे. त्याने त्याचा खेळ असाच सकारात्मकपणे पुढे कोणत्याही दबावा विना करीत रहावा. माझ्याकडे विविधतापूर्ण संघ असल्याने मला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सहजपणे बदल करता येत आहे.’

बोल्टला मोठ्या सामन्यासाठी खेळायचंय

ट्रेंट बोल्ट सामन्यादरम्यान जखमी झाल्याने त्याला फक्त 2 षटकेच रोहितने करण्यास दिली होती. रोहित म्हणाला, “बोल्ट आता ठीक आहे. पुढच्या मोठ्या सामन्यासाठी त्याचे संघात असणे खूप महत्त्वाचे आहे. मला खात्री आहे की तंदुरुस्त राहून पुढच्या सामन्यात मैदानात दिसेल.

कमालीचा बुमराह

रोहित म्हटला, “जर तुमच्याकडे बुमराहसारखा गोलंदाज असेल तर खेळ तुमच्यासाठी सोपा होतो. त्याने आखलेल्या रणनीतीनुसार गोलंदाजी केली व तो प्रशंसेस पात्र आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

Video: …आणि त्याने चेंडू खाली पडूच दिला नाही; पाहा राहुल चाहरने घेतलेला अवघड झेल

“जो आया हैं, वो जायेगा भी” मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीची उडतेय खिल्ली; पाहा भन्नाट मीम्स

क्वालिफायर सामन्यानंतर पर्पल कॅप बुमराहच्या डोक्यावर तर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठे बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---