---Advertisement---

हृदय जिंकलंस भावा! ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी रोहितने महिला चाहतीचा दिवस केला खास, व्हिडिओ पाहाच

On: गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022 9:55 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

आख्ख्या जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकाकडे लागले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघही ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने विमानतळावर त्याच्या एका महिला चाहतीला ऑटोग्राफ दिला आहे. रोहित त्याच्या चाहतीला भेटल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रोहितने चाहतीचा दिवस बनवला खास
विशेष म्हणजे, विमानतळावर उपस्थित असलेल्या रोहित शर्मा याच्या चाहतीचा वाढदिवस होता. रोहितने तिला ऑटोग्राफ दिल्यानंतर तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. महिला चाहती रोहितला भेटल्यानंतर भलतीच उत्साही असल्याचे दिसले. खरं तर, मनाच्या मोठेपणाने रोहितने त्याच्या चाहत्यांची मने जिंकण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही तो त्याच्या चाहत्यांचा दिवस खास बनवताना दिसला आहे.

https://twitter.com/CricParodyJohns/status/1577902202383138816

रोहितच्या नेतृत्वात भारत पहिल्यांदा खेळणार टी20 विश्वचषक
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका 2-1ने खिशात घातली होती. ही भारतीय संघाची टी20 विश्वचषकापूर्वीची शेवटची टी20 मालिका होती. आता भारतीय संघ या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. रोहितच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ पहिल्यांदाच टी20 विश्वचषकात आव्हान देणार आहे.

टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय आहे रोहित
रोहितने मागील सर्व सात टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने विश्वचषकात 38.50च्या सरासरीने 131.52च्या स्ट्राईक रेटने 847 धावा चोपल्या आहेत. त्याच्यानंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू विराट कोहली आहे. त्याने 76.81च्या सरासरीने 845 धावा चोपल्या आहेत. रोहित टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा एकूण चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. या यादीत अव्वलस्थानी माहेला जयवर्धने (1016) आहे. त्याच्यानंतर ख्रिस गेल (965) आणि तिलकरत्ने दिलशान (897) यांचा क्रमांक लागतो.

रोहित शर्मा हा ख्रिस गेल, एमएस धोनी आणि मुशफिकुर रहीम यांच्यासोबत संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक 33 सामने खेळणारा खेळाडू आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे पदार्पणात ऋतुराजचा ‘फ्लॉप शो’! 42 चेंडूत अवघ्या 19 धावा करत धरली तंबूची वाट
ज्या ताटात खाल्ले, त्याच ताटात छेद! रबाडाचे आयपीएलबद्दल मोठे भाष्य; म्हणाला, ‘भारतीयांच्या कमजोरीविषयी…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---