बांगलादेश संघाचा कर्णधार आणि सर्वात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन याने एकप्रकारे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने कधी निवृत्ती घेणार हे स्पष्ट केले आहे. मात्र, तो आता लगेच निवृत्त होणार नाहीये. शाकिबने यावेळी हेही सांगितले की, तो विश्वचषक 2023 स्पर्धेनंतर संघाचे नेतृत्वही करणार नाहीये. आता शाकिबच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बुधवारी (दि. 27 सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने रिटायरमेंट प्लॅन सांगून सर्वांना धक्का दिला. शाकिब म्हणाला की, तो पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्त होईल.
‘मी एकसोबत तिन्ही क्रिकेट प्रकारातून निवृत्त होईल’
निवृत्तीविषयी बोलताना शाकिब म्हणाला, “माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा प्रश्न असेल, तर मी कदाचित वनडेत 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत खेळेल. तसेच, टी20 क्रिकेटमध्ये मी 2024च्या टी20 विश्वचषकानंतर निवृत्ती घेऊ शकतो. तसेच, कसोटी क्रिकेटविषयी बोलायचं झालं, तर मी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेनंतर निवृत्त होऊ शकतो. कदाचित मी तिन्ही क्रिकेट प्रकारातून एकाच वेळी निवृत्ती घेईल. कुणालाही माहिती नाही की, पुढे काय होणार आहे, पण सध्या माझा हाच विचार आहे.”
"May be I will retire from three formats at the same time" – Shakib Al Hasan opens up on his playing future#Bangladesh #ShakibAlHasan #ICCWorldCup #ICCWorldCup2023 pic.twitter.com/jRDpgH58Br
— MrDeepak (@X_MrDeepak) September 28, 2023
वनडे विश्वचषकानंतर कर्णधारपदाविषयी बोलताना तो म्हणाला, “तसेच, या विश्वचषकानंतर मी वनडेत नेतृत्वही करणार नाही. मला एक गोष्ट स्पष्ट करू द्या. मी 17 सप्टेंबर रोजी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. जेव्हा मी असे करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मला माहिती नव्हते की, अशाप्रकारची परिस्थिती असणार आहे. पापोन भाई मला म्हणाले की, त्यांना मी कर्णधार म्हणून हवा आहे. माझ्यासाठी नाही, तर संघासाठी आणि त्यामुळे मी कर्णधारपदासाठी तयार झालो. नेतृत्व न केल्याने माझ्यासाठी गोष्टी सोप्या होतात.”
Shakib Al Hasan on an interview said that he want to retire from all formats after Champions Trophy 2025.
(Cricbuzz) pic.twitter.com/ThFxVSQTVW— Anish Mondal (@AnishMondal3437) September 27, 2023
शाकिबची कारकीर्द
बांगलादेश संघाकडून अष्टपैलू शाकिब अल हसन मागील 16 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. यादरम्यान त्याने कसोटीत 66, वनडेत 240 आणि आंतरराष्ट्रीय टी20त 117 सामने खेळले आहेत. त्यात कसोटीत त्याने 4454 धावा, वनडेत 7384 धावा आणि टी20त 2382 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त गोलंदाजी करताना त्याने कसोटीत 233 विकेट्स, तर वनडेत 308 आणि टी20त 140 विकेट्स घेतल्या आहेत. (cricketer shakib al hasan wants to retire after the 2025 champions trophy)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! वर्ल्डकपपूर्वी ऐन मोक्याच्या क्षणी बाहेर झाला जबरदस्त खेळाडू, लगेच वाचा
अर्रर्र! बुमराहने 3 विकेट्स घेऊनही नावावर झाला लाजीरवाणा विक्रम, 6 वर्षांनंतर बूम बूमची खराब गोलंदाजी