भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला टी20 सामना किंग्समीड, डर्बन या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने 61 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. या विजयासह भारत या टी20 मालिकेत 1-0 अशा आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या शानदार विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजू सॅमसनचे (Sanju Samson) झंझावाती शतक आणि वरूण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) यांच्या दमदार गोलंदाजीमुळे भारताने डर्बनमध्ये शानदार विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावत 202 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ 141 धावांत गारद झाला.
कर्णधारपदाच्या ओझ्याबाबत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) म्हणाला, “जसे मी टॉसनंतर आणि पत्रकार परिषदेत आधीच सांगितले होते. मुलांनी माझे काम सोपे केले आहे. मला कोणतेही ओझे घेण्याची गरज नाही. त्यांच्यात ज्या प्रकारे भिता खेळण्याची वृत्ती आहे. ते मैदानावर आणि मैदानाबाहेर मजा करत आहेत, ज्यामुळे माझे काम सोपे होते, जरी आम्ही काही विकेट्स गमावल्या तरीही आम्हाला कोणत्याही भीतीशिवाय खेळायचे आहे. आम्हाला माहित आहे की आमच्याकडे 20 षटके आहेत, परंतु जर तुम्ही 17 षटकात 200 धावा करू शकता मग का नाही.”
दक्षिण आफ्रिकेला 203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता, तर डेव्हिड मिलर (David Miller) आणि हेनरिक क्लासेन (Heinrich Klaasen) यांना झटपट धावा करायच्या होत्या, पण कर्णधार सूर्याच्या हुशारीमुळे हे दोन्ही विस्फोटक फलंदाज मोकळे खेळू शकले नाहीत. याबाबत सूर्यकुमार यादव म्हणाला, “आम्ही क्लासेन आणि मिलरच्या महत्त्वाच्या विकेट्सच्या शोधात होतो, त्यांनी फिरकीपटूंविरूद्ध ज्या पद्धतीने कामगिरी केली ती अविश्वसनीय होती. आम्हाला केवळ महत्त्वाच्या क्षणी फिरकीपटू आणायचे होते.”
संजू सॅमसनच्या खेळीबद्दल सूर्यकुमार म्हणाला, “गेल्या काही वर्षांत त्याने (संजू सॅमसन) जे परिश्रम घेतले आहेत, त्याचे फळ त्याला आता मिळत आहे. तो 90 धावांवर होता, पण तरीही तो फटकेबाजी करत होता. हे संघासाठी खेळणाऱ्या व्यक्तीचे चारित्र्य दाखवून देते.”
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना ओव्हलच्या मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना (10 नोव्हेंबर) रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SA; शानदार शतकानंतर संजू सॅमसनने मोठे वक्तव्य करत जिंकली चाहत्यांची मनं!
भारताच्या कसोटी संघात पुजारासाठी स्थान आहे, माजी खेळाडूने मोठे वक्तव्य!
भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआयची 6 तास मॅरेथाॅन मीटिंग, गंभीर, रोहित, आगरकर निशाण्यावर