गेल्या पाच दिवसांपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत होते. या सामन्याच्या पहिल्या डावात आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावातही भारतावरील दबाव कायम राखला होता. मार्नस लॅब्यूशाने, स्टिव्ह स्मिथ आणि कॅमरॉन ग्रीन यांच्या मोठ्या आकडी धावसंख्येमुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात भारतापुढे ४०७ धावांचे आव्हान उभारले होते. प्रत्युत्तरात २७२ धावांवर ५ विकेट्स गमावल्यानंतर तळातील फलंदाज बचावात्मक खेळी करत होते. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनच्या हातून मोठी चूक घडली.
हनुमा विहारीला मिळाले योगदान
झाले असे की, भारताचा कसोटी स्पेशलिस्ट हनुमा विहारी आणि फिरकीपटू आर अश्विन विकेट वाचवून फलंदाजी करत होते. अशात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क डावातील १२३ वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील पाचव्या चेंडूवर विहारीने बॅटने हलकासा स्पर्श केला आणि चेंडू यष्टीमागे सरळ कर्णधार टीम पेनच्या दिशेने गेला.
टीम पेनने चेंडू पकडण्यासाठी डाव्या बाजूला मोठी डाइव्हदेखील मारली. परंतु तो झेल पूर्ण करु शकला नाही. त्याच ठिकाणी इतर दोन खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उभा राहिले होते. पण त्यांनाही चेंडू पकडण्यात यश आले नाही. त्यामुळे विहारीला जीवदान मिळाले. हे पाहून स्टार्कनेही हताश होऊन डोके धरले.
जर टीम पेन किंवा बाजूच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विहारीचा तो झेल पकडला असता; तर भारताने अजून एक महत्त्वपुर्ण विकेट गमावली असती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना खालच्या फळीत फलंदाजीसाठी येणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या पटापट विकेट मिळू शकल्या असत्या. परिणामत: ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला असता. परंतु विहारीचा झेल सोडत ऑस्ट्रेलियाच्या हातून सामना जिंकण्याची शेवटची संधीही निसटली.
Another dropped catch ????
Was that Australia's last chance to try and win the game?#AUSvIND ▶️ https://t.co/jOSQoYOuSCpic.twitter.com/Ct2MPKDCXy
— ICC (@ICC) January 11, 2021
विहारी आणि अश्विन जोडीकडून कामगिरी फत्ते
शेवटी विहारी आणि अश्विनने पाचव्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद फलंदाजी केली. विहारीने १६१ चेंडूत नाबाद २३ धावा आणि अश्विनने १२८ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघ सर्वबाद व्हायच्या आत शेवटच्या दिवसाचा खेळ संपला आणि सामना अनिर्णीत राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
“हाताचं प्रत्येक बोट वेगवेगळं काम करत, अगदी तसंच..” सचिनकडून पुजारा-पंतवर कौतुकाची थाप
टीम इंडियाला चौथ्या डावात २०० धावाही करता येणार नाही म्हणणाऱ्या ‘त्या’ दिग्गजाला सणसणीत चपराक






