---Advertisement---

मॅन ऑन मिशन! आयपीएल स्थगित झाल्यानंतर विराटने कोरोनाच्या काळात ‘हे’ महत्वाचे कार्य घेतले हाती

On: गुरूवार, मे 6, 2021 2:45 PM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली हा मंगळवारी आपल्या निवासस्थानी परतला आहे. मैदानात तुफान फटकेबाजी करून झाल्यानंतर तो आता कोरोनाच्या लढ्यात देखील मदत कार्य करताना दिसून येणार आहे. तसेच यापूर्वी देखील तो अनेकदा संकटकाळी मदत करण्यासाठी धावून आला आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो कोरोना लढ्यात सहकार्य करण्यासाठी योजना आखताना दिसून येत आहे.

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याचाच फटका आयपीएल २०२१ स्पर्धेला देखील बसला आहे.कडक बायो बबल असताना देखील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच मंगळवारी घरी पोहोचल्यानंतर, विराटने युवा सेनेचे सदस्य, राहुल एन कनल यांची भेट घेतली होती. भारतीय कर्णधाराने या कठीण काळात राज्य आणि देशाला सपोर्ट करण्यासाठी भेट दिली होती.

तसेच या भेटीचे फोटो राहुलने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. ज्यामध्ये दोघेही चर्चा करताना दिसून येत आहेत. तसेच त्याने कॅपशन मध्ये लिहिले की, “आपल्या कर्णधारासोबत भेट, त्यांच्या प्रयत्नांसाठी खूप प्रेम आणि आदर जे त्यांनी कोरोनाच्या कठीण काळात केले आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी शब्द नाहीयेत. फक्त सन्मान आणि प्रार्थना आहे.” हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://twitter.com/Iamrahulkanal/status/1389926284348645385?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1389926284348645385%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-virat-kohli-starts-working-for-covid-19-relief-after-bcci-suspends-ipl-2021-fans-says-no-words-just-respect-3579559.html

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची यंदा उल्लेखनीय कामगिरी
गेल्या १३ हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे.परंतु या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. बेंगलोर संघातील फलंदाज देवदत्त पडीक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलीयर्स आणि कर्णधार कोहली यांनी मोलाची भूमिका बजावली होती. तसेच गोलंदाज देखील चांगल्याच फॉर्म मध्ये होते. हर्षल पटेलने या हंगामात उल्लेखनीय गोलंदाजी केली होती. तसेच सिराजनेही त्याला चांगली साथ दिली होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने या हंगामात ७ सामने खेळले होते. यात त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच हा संघ गुणतालिकेत १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीचा आणखी एक कौतुकास्पद निर्णय! सगळे खेळाडू घरी सुरक्षित परतल्यावर मगच जाणार रांचीला

अवघ्या २० लाखात संधी मिळाले खेळाडू, ज्यांनी यंदाच्या आयपीएल हंगामात केली बहारदार कामगिरी

आयपीएल भारतात आयोजित करण्याचा बीसीसीआयचा निर्णय चुकला का? गांगुलीने दिले उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---