न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत ( INDvNZ Test Series ) भारतीय संघाने १-० असा विजय मिळवला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. मात्र, कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त पुनरागमन करत संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला असला तरी, काही गोष्टी आहेत, ज्याबाबत सर्वांनाच चिंता आहे. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे विराट कोहली ( Virat Kohli ) याचा सध्याचा खराब फॉर्म. चाहत्यांना विराटच्या फॉर्मची चिंता वाटत असली तरी तो स्वतः मात्र या गोष्टीची कसलीच फिकीर करत नाही.
विराटने मागच्या दोन वर्षात एकही शतक केले नाहीय. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतही विराटच्या शतकाचा दुष्काळ (Virat Century Drought) संपला नाही. त्याने त्याचे शवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात केले होते. मात्र, विराट या गोष्टींचा जास्त विचार करत नाही. न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर विराट त्याच्या खेळीविषयी बोलला.
तो यावेळी म्हटला की, “कधी कधी अशा गोष्टी तुम्हाला माहीत असतात आणि अनेकदा माहीत नसतात देखील. मात्र, परिश्रम आणि प्रक्रियेवर विश्वास कायम राहिला पाहीजे. यामध्ये कसल्याच प्रकारचा हलगर्जीपणा नसावा. कारण, ही गोष्ट स्वतःच्या अनुभवातून समजते. जेव्हा चुका पुन्हा पुन्हा केल्या जातात, तेव्हा त्या
तत्काळ सुधारण्याची गरज असते. तुम्हाला स्वतःला सुधारत राहायचे असते आणि पुन्हा पुन्हा होणाऱ्या चुकांना दुर करणे गरजेचे आहे. त्यांच्यावर काम करायचे असते. तुम्हाला समजून घ्यायचे आणि विश्वास ठेवायचा असतो की, अशाप्रकारच्या गोष्टींवर देखील नियंत्रण ठेवले जाऊ शकते.”
या महिन्यात भारताचा दक्षिण अफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) सुरू होणार आहे. या दौऱ्यावर अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या संघातील स्थानाविषयी अनिश्चितता वर्तवली जात आहे. याबाबत बोलताता विराट म्हटला की, “चर्चा करण्याची गरज आहे. कोणकोणत्या जागेवर खेळू शकतो आणि याचसारख्या इतर मुद्यांवर चर्चा होईल. याबाबतीत पत्रकार परिषदेत उत्तर देऊ शकणार नाही. आम्हाला बसण्याची आणि एकत्र निर्णय घेण्याची गरज आहे. आम्ही याच पद्धतीचा अवलंब करू. सर्वजण त्यांचे विचार मांडतील आणि तेव्हा आम्ही निर्णय घेऊ.”
महत्त्वाच्या बातम्या-
एका दिग्गजाची दुसऱ्या दिग्गजाला दाद! आर अश्विनकडून एजाज पटेलला खास भेट, व्हिडिओ व्हायरल
संघ वेगळे, पण नावांनी जोडले! मुंबई कसोटीनंतर वानखेडे स्टेडियमवर दिसले अनोखे दृश्य
“भाई किस लाईन मे आ गये आप”, पुजाराने षटकार मारताच सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस