बर्मिंगहॅम। आज(2 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना पार पडणार आहे. एजबस्टर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताच्या 11 जणांच्या संघात 2 बदल करण्यात आले आहेत. आज कुलदीप यादव ऐवजी भुवनेश्वर कुमारला 11 जणांच्या संघात संधी मिळाली आहे. तर केदार जाधव ऐवजी दिनेश कार्तिकला संधी मिळाली आहे.
विश्वचषकातील हा दिनेशचा पहिलाच सामना आहे. त्याला 2007 च्या विश्वचषकात भारतीय संघात संधी मिळाली होती. पण त्याला एकाही सामन्यात अंतिम 11 जणांमध्ये संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आज कार्तिक विश्वचषकात पदार्पण करत आहे.
त्याचबरोबर बांगलादेशच्या 11 जणांच्या संघात आज मेहदी हसन ऐवजी रुबेल हुसेनला संधी देण्यात आली आहे. तर दुखापतग्रस्त महमुद्दुलाहच्या ऐवजी सब्बीर रेहमानला आज बांगलादेशकडून संधी मिळाली आहे.
असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार) केएल राहुल, रोहित शर्मा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, एमएस धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
बांगलादेश – मश्रफे मोर्तझा (कर्णधार), तामिम इक्बाल, लिटॉन दास, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), सौम्य सरकार, सब्बीर रहमान, मोसद्देक हुसेन, मोहम्मद सैफुद्दीन, रुबेल हुसेन, मुस्तफिजूर रहमान.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टॉप ५: भारत-बांगलादेश संघात होणाऱ्या सामन्यात हे खास ५ विक्रम करण्याची भारतीय खेळाडूंना संधी
–विश्वचषक इतिहासात असे पहिल्यांदाच घडले
–विजय शंकरच्या जागी निवड झालेल्या मयंक अगरवालची अशी आहे कामगिरी






