---Advertisement---

विजय शंकरच्या जागी निवड झालेल्या मयंक अगरवालची अशी आहे कामगिरी

On: सोमवार, जुलै 1, 2019 8:56 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकातून भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर बाहेर पडला आहे. शंकरला डाव्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली असल्याने या विश्वचषकातून बाहेर पडावे लागत आहे.

त्याच्याऐवजी उर्वरित विश्वचषकासाठी युवा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालची भारतीय संघात निवड केली असल्याचे आज(1 जूलै) बीसीसीआयने जाहिर केले आहे. अगरवालने अजून भारताच्या वरिष्ठ संघाकडून एकही वनडे सामना खेळलेला नाही.

पण त्याने मागील वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यातून भारताकडून पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच चांगली कामगिरी करताना पहिल्या डावात 76 आणि दुसऱ्या डावात 42 धावांची खेळी केली होती.  आता त्याला वनडेमध्येही विश्वचषकातून पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

कर्नाटककडून खेळणाऱ्या अगरवालने मागील अनेक दिवसांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसेच भारत अ संघाकडून चांगली कामगिरी केली आहे.

त्याचा मागीलवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारत अ संघाने केलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही भारतीय संघात समावेश होता. या दौऱ्यात त्याने दोन कसोटी आणि दोन वनडे अशा चार सामन्यात मिळून 39.60 च्या सरासरीने 198 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे. या दौऱ्यात भारताकडून त्याने दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या आहेत.

तसेच त्याने सप्टेंबर2018 मध्ये विंडीज विरुद्धच्या सराव सामन्यात 90 धावा केल्या होत्या. त्याआधी त्याची 2018 मध्ये जून जुलै महिन्यात भारतीय अ संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यातही निवड झाली होती. यात त्याने तीन शतके आणि एक अर्धशतकासह 8 सामन्यात 56.77 च्या सरासरीने 511 धावा केल्या होत्या.

त्याचबरोबर 2017-18 च्या रणजी ट्रॉफी मोसमातही तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने या मोसमात 13 डावात 105.45 च्या सरासरीने 1160 धावा केल्या होत्या. 2017-18च्याच मोसमात त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने 8 डावात 723 धावा केल्या होत्या.

तसेच मयंकचा 2010 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठीही भारतीय संघात समावेश होता. या स्पर्धेत त्याने 27.83 च्या सरासरीने 6 सामन्यात 167 धावा केल्या होत्या.

मयंकने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 50 प्रथम श्रेणी सामन्यात 50.17 च्या सरासरीने 3964 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 8 शतकांचा आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 75 सामन्यात 48.71 च्या सरासरीने 3605 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 12 शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत.

त्याचबरोबर त्याने भारताकडून खेळलेल्या दोन कसोटी सामन्यात 65 च्या सरासरीने 195 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने दोन अर्धशतके केली आहेत.

तर तो त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 134 ट्वेंटी20 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 24.49 च्या सरासरीने 2939 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 18 अर्धशतके केली आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

पाकिस्तानच्या या खेळाडूने काढली भारताची खोड!

धोनीने इंग्लंड विरुद्ध वनडेमध्ये रचला इतिहास, युवराज सिंगलाही टाकले मागे

विजय शंकरच्या ऐवजी या खेळाडूची झाली टीम इंडियात निवड; बीसीसीआयने केली घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment