---Advertisement---

धोनीने इंग्लंड विरुद्ध वनडेमध्ये रचला इतिहास, युवराज सिंगलाही टाकले मागे

On: सोमवार, जुलै 1, 2019 6:47 PM
---Advertisement---

बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात रविवारी(30 जून) एजबस्टर्न स्टेडीयमवर इंग्लंड विरुद्ध भारत संघात 38 वा सामना पार पडला. या सामन्यात भारताला 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला. हा भारताचा या विश्वचषकातील पहिलाच पराभव आहे.

या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला असला तरी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने इंग्लंड विरुद्ध वनडेमध्ये खास पराक्रम केला आहे. धोनीने ज्यावेळी या सामन्यात 19 वी धाव घेतली, तेव्हा तो इंग्लंडविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकटपटू ठरला आहे.

धोनीने या सामन्यात 31 चेंडूत नाबाद 42 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यामुळे त्याच्या आता इंग्लंडविरुद्ध वनडेमध्ये 48 सामन्यात 46.84 च्या सरासरीने 1546 धावा झाल्या आहेत. यामध्ये धोनीच्या एका शतकाचा आणि 10 अर्धशतकाचा समावेश आहे.

त्याने हा विक्रम करताना भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगला मागे टाकले आहे. युवराजने इंग्लंडविरुद्ध वनडेमध्ये 37 सामन्यात 50.76 च्या सरासरीने 4 शतके आणि 7 अर्धशतकांसह 1523 धावा केल्या आहेत.

भारताकडून इंग्लंडविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू –

1546 धावा – एमएस धोनी (48 सामने)

1523 धावा – युवराज सिंग (37 सामने)

1455 धावा – सचिन तेंडुलकर (37 सामने)

1207 धावा – सुरेश रैना (37 सामने)

1178 धावा – विराट कोहली (30 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विजय शंकरच्या ऐवजी या खेळाडूची झाली टीम इंडियात निवड; बीसीसीआयने केली घोषणा

युजवेंद्र चहलने मोडला १६ वर्षांपूर्वीचा नकोसा असा विक्रम…

धोनी-केदारच्या धीम्या खेळीचा विराट-रोहितने केला बचाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment