आयपीएल 2019 चा मोसम उद्यापासून(23 मार्च) सुरु होत आहे. या आयपीएलच्या 12 व्या मोसमातील पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे.
यावर्षी अनेक संघाच्या ताफ्यात काही नवीन चेहेरे दिसणार असले,तरी मात्र कोणत्याही संघाने नेतृत्वामध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे मागच्या मोसमातीलच सर्व संघांचे कर्णधार यावर्षीही त्यांच्या संघांच्या नेतृत्वाची धूरा सांभाळतील.
मागीलवर्षी दिल्ली संघाचे नेतृत्व सुरुवातीच्या काही सामन्यात गौतम गंभीरने सांभाळले होते, पण खराब कामगिरीमुळे त्याने कर्णधार पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्या मोसमाच्या अर्ध्यातच श्रेयस अय्यरकडे दिल्लीचे नेतृत्व देण्यात आले. तसेच यावर्षीही श्रेयसलाच दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार म्हणून कायम ठेवले आहे.
त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद संघांचे माजी कर्णधार अनुक्रमे स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे त्यांच्या संबंधित संघात पुनरागमन झाले आहे. मागीलवर्षी त्यांच्यावर चेंडू छेडछाड प्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातली होती. त्यामुळे ते मागीलवर्षाच्या आयपीएल मोसमालाही मुकले होते.
पण यावर्षी पुनरागमन केल्यावर ते पुन्हा त्यांच्या संबंधित संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळणार का, असा प्रश्न होता. परंतू राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेला आणि सनरायझर्स हैद्राबादने केन विलियम्सनलाच कर्णधारपदी कायम ठेवले आहे.
आयपीएल 2019 चे कर्णधार न्याय्य खेळाच्या प्रतिज्ञेवर स्वाक्षरी करण्यासाठी आणि कर्णधारांच्या बैठकीसाठी चेन्नईमध्ये आज(22 मार्च) उपस्थित होते.
हे आहेत आयपीएल 2019 चे सर्व संघाचे कर्णधार –
चेन्नई सुपर किंग्स – एमएस धोनी
रॉयल चालेंगर्स बेंगलोर – विराट कोहली
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा
दिल्ली कॅपिटल्स – श्रेयस अय्यर
किंग्स इलेव्हन पंजाब – आर अश्विन
सनरायझर्स हैद्राबाद – केन विलियम्सन
कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक
राजस्थान रॉयल्स – अजिंक्य रहाणे
महत्त्वाच्या बातम्या-
–अबब!! २५ चेंडूत शतक, ते ही २० वर्षीय खेळाडूने केले, पहा व्हिडिओ
–या आशियाई देशांत दिसणार नाही आयपीएल २०१९ चे थेट प्रक्षेपण..