विशाखापट्टणम। आज (24 आॅक्टोबर) सुरू असलेल्या भारत विरुद्ध विंडीज दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद 157 धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने 2018 वर्षात वनडेमध्ये 11 सामने खेळताना 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.
कर्णधार म्हणून एकाच वर्षी वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा विराटने सलग दुसऱ्या वर्षी पार केला असून असे करणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे. याआधी त्याने 2017ला अशी कामगिरी केली होती.
विराट प्रमाणेच कर्णधार म्हणून एकाच वर्षी वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा पार करणाऱ्यांमध्ये भारताचा सचिन तेंडुलकर(1997), ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटींग (2005), श्रीलंकेचा अजेंलो मॅथ्यूज (2014) आणि स्टीव्ह स्मिथ (2016) यांचा समावेश आहे.
तसेच विराटने विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 24वे शतक साजरे करताना 2018 वर्षात 1000 धावा पूर्ण केल्या. सलग तिसऱ्या वर्षी कसोटीमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठणारा विराट पहिलाच कर्णधार ठरला आहे. त्याने कसोटीमध्ये 2016ला 1215 धावा आणि 2017ला 1059 धावा केल्या होत्या.
तसेच इंग्लंडचा जॉनी बेयरस्टो वनडेमध्ये यावर्षी 1000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
विराट यावर्षी वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा पहिलाच फंलदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहली कर्णधार म्हणूनही ठरला हीट; कधीही विचार केला नाही असा विक्रम आता खिशात
–१० हजार धावा करणाऱ्या कोहलीचे हे आहेत १० खास पराक्रम
–टीम इंडियासाठी सोनियाचा दिनु, कर्णधार कोहलीच्या वन-डेत १० हजार धावा