क्रिकेटचा सर्वात सुंदर प्रकार म्हणजे कसोटी क्रिकेट. प्रत्येक क्रिकेट खेळाडूचे एक स्वप्न असते की, आपण आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेट खेळू. खूप असे खेळाडू असतात जे स्वत:च्या देशासाठी एकदिवसीय तसेच टी२० सामन्यात प्रतिनिधित्व करतात. परंतु, त्यांचे कसोटी क्रिकेट खेळण्याचे नशीब उघडत नाही. काही खेळाडूंनी मेहनत करून आपल्या देशासाठी कसोटी संघात आपले स्थान कायम केले. तसेच स्थान कायम करण्यासोबतच त्यांनी सुंदर प्रदर्शन करून संघासाठी कर्णधारपद देखील मिळवले. असे कर्णधार ज्यांनी नुसते संघात राहून नेतृत्व केले नाही तर, स्वत:च्या बळावर संघाला विजय मिळवून दिला. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत ती म्हणजे, कसोटी सामन्यात सर्वाधिक शतक करणारे कर्णधार.
१)ग्रॅमी स्मिथ- दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथला लहान वयातच दक्षिण आफ्रिका कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली होती. त्याने याचा खूप चांगला उपयोग करून घेतला होता. ग्रॅमी स्मिथच्या कर्णधारपदाखाली दक्षिण आफ्रिका संघाने खूप सामने जिंकले. संघाच्या विजयासोबतच ग्रॅमी स्मिथने आपल्या फलंदाजीने देखील उपयुक्त योगदान दिले. त्याने त्याचा कर्णधारापदाच्या कारकिर्दीत एकूण १९३ सामने खेळले. त्यात त्याने २५ शतक ठोकली. इतक्या वर्षानंतर हा विक्रम अजूनही अबाधित आहे.
२)विराट कोहली- वर्तमान क्रिकेट विश्वातील आघाडीचा खेळाडू विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. कोहलीने सुद्धा या दिग्गजांच्या यादीत आपले नाव प्रस्थापित केले आहे. कोहलीला कसोटी कर्णधारपद मिळाले तेव्हा भारतीय संघ कसोटी क्रमवारीत सातव्या स्थानावर होता. त्यानंतर कोहलीने भारतीय कसोटीचा चेहरा मोहरा बदलला. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ सलग पाच वर्ष आता अव्वल क्रमांकावर आहे. कोहलीने कर्णधारपद भूषवताना फलंदाजीतही भरीव कामगिरी केली. कोहलीने कसोटी सामन्यात आजवर ६० वेळा कर्णधारपद भूषवले. त्यात त्याने २० शतके झळकावली. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील पोहोचला आहे.
३)रिकी पॉंटिंग- जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये जर कोणाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते तर ते म्हणजे पॉंटिंग. पॉंटिंगने एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला दोन वेळा विश्वचषक जिंकवून दिले. पॉंटिंगने आज वर ऑस्ट्रेलियासाठी १४० कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवले. त्यात त्याने एक वेळेस अॅशेस मालिका सुद्धा जिंकली आहे. पॉंटिंगने कर्णधारपदी असताना एकून १९ शतके जोडली.
महत्वाच्या बातम्या:
विंडिज आणि बांग्लादेश दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, अजून एका भावंडांच्या जोडीचीही निवड
या कारणामुळे कोहली ठरतो जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज, राशिद खानने सांगितली खुबी
विराट-रोहित नाही, तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत या खेळाडूंची भूमिका निर्णायक