---Advertisement---

‘या’ कारणामुळे कोहली ठरतो जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज, राशिद खानने सांगितली खुबी

On: मंगळवार, जून 8, 2021 9:50 PM
---Advertisement---

क्रिकेट विश्वातील सध्याच्या घडीचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून विराट कोहली ओळखला जातो. त्याच्या कामगिरीने ही गोष्ट अगदी दिसून येतो. विराट कोहली इतका यशस्वी फलंदाज का आहे, याविषयी क्रिकेट अभ्यासक आपली विविध मतं मांडत असतात. आता विराटच्या फलंदाजीविषयी अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने आपले मत मांडले आहे. राशिदने यावेळी कोहलीमध्ये अशी नेमकी कोणती खुबी आहे, ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ फलंदाज ठरतो, याचे विश्लेषण केले आहे.

राशिद खानने युट्यूबवरील एका कार्यक्रमात बोलतांना सांगितले की, “विराट कोहली हा आपल्या खेळावर, आपल्या तंत्रावर विश्वास ठेवत असतो. जिथे अतिशय अचूक आणि सर्वश्रेष्ठ चेंडूविरुद्ध जेव्हा अन्य फलंदाज असा फटका मारण्याचा प्रयत्न करतात, जी त्यांची ताकद नाही.”

राशिदने सांगितले की, “दुसरा कुणी खेळाडू फलंदाजी करत असेल आणि जर त्याला तुम्ही चांगली गोलंदाजी करीत असाल तर तो फलंदाज दबावात येतो. आणि मग तो स्वीप, स्लॉग स्वीप किंवा अन्य कोणता फटका खेळतो, जो त्याची ताकद नाही. परंतु विराट कोहली आपल्या तंत्राचेच पालन करतो. तो आपल्या डोक्याचा वापर करून खेळतो आणि आपापला स्वाभाविक खेळ तो खेळत जातो. तो काही वेगळा करायचा प्रयत्न करीत नाही आणि त्यामुळेच तो यशस्वी ठरतो.”

भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर कोहलीचे प्रदर्शन अजूनच बहरत गेले, असे कौतुकोद्गार देखील यावेळी राशिदने काढले. कोहलीचा आत्मविश्वास ही त्याची ताकद असून त्याने संघातील इतर खेळाडूंमध्येही आत्मविश्वास निर्माण केला, असे राशिद म्हणाला. मात्र त्याचवेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची इच्छा देखील राशिदने प्रकट केली.

महत्वाच्या बातम्या:

विराट-रोहित नाही, तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत या खेळाडूंची भूमिका निर्णायक

इंग्लिश क्रिकेटमध्ये वादळ! आणखी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची होणार वर्णद्वेषी टिप्पणीसाठी चौकशी

चहलने शेअर केला पत्नीसोबत व्यायाम करतानाचा व्हिडिओ, चाहत्यांनी दिले मजेशीर सल्ले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---