नुकताच वेस्ट इंडिजचा भारत दौरा (IND vs WI) पार पडला. या दौऱ्यात वेस्ट इंडिजला अपयश आले. आता वेस्ट इंडिज संघ मायदेशात इंग्लंडसोबत (WI vs ENG) कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी इंग्लंडने आपल्या कसोटी संघात जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) या दोन अनुभवी वेगवान गोलंदाजांना स्थान दिलेले नाही. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंची कसोटी कारकीर्द आता अंतिम वळणावर आली असल्याची अशी शंका जाणकारांकडून उपस्थित केली जात आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने (Joe root) आता या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
नुकताच इंग्लंडचा संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. तेथे संघाने ५ कसोटी सामन्यांची मालिका ४-० ने गमावली, त्यानंतर इंग्लंडमध्ये अनेक बदल केले गेले. ब्रॉड आणि अँडरसनही यांना ही संघात स्थान दिले नाही, पण कर्णधार जो रूट म्हणाला की, तो आपल्या दोन्ही स्टार खेळाडूंशी बोलला आहे, ते चिडले होते, पण त्यांची कारकीर्द संपलेली नाही असे त्यांना समजवण्यात आले आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडने कॅरेबियन कसोटी दौर्यासाठी १६ जणांचा संघ जाहीर केले. ज्यामध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचा समावेश नाही. ब्रॉड आणि अँडरसन व्यतिरिक्त इसीबीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या संघातून डॉम बेस, सॅम बिलिंग्स, रॉरी बर्न्स, जॉस बटलर, हसीब हमीद आणि डेव्हिड मलान यांना देखील वगळले आहे.
जो रूटने कबूल केले की, संघातून वगळल्यानंतर ब्रॉड आणि अँडरसनला राग आला होता. जो रूटने आयसीसीला सांगितले की, “मी अँडरसन आणि ब्रॉड या दोघांशी बोललो आहे आणि ते निराश आणि रागावले आहेत. तुम्हाला याची अपेक्षा असेल. त्यांना स्पष्ट करण्यात आले आहे की, या दोन्ही खेळाडूंसाठी क्रिकेटचा अंत आहे, असे कोणीही म्हणत नाही. या दोन खेळाडूंना उन्हाळ्याच्या हंगामात संघासाठी खेळताना पाहणे चाहत्यांना आवडेल.” अँडरसनने काऊंटी क्रिकेटमध्ये आपले स्थान पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. यावर्षी न्यूझीलंड आणि भारताविरुद्धच्या मालिकेसाठी तो संघात असेल.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या खेळाडूंना भविष्यात संघात स्थान मिळण्याची दाट संधी असल्याचे कर्णधार रुटने स्पष्ट केले आहे. जो रूट म्हणाला, “दौऱ्यावर असलेल्यांना वेगवेगळ्या भूमिका साकारून या संघाला पुढे घेऊन जाण्याची संधी मिळाली आहे. गोलंदाज मार्क वूड, ऑली रॉबिन्सन आणि ख्रिस वोक्स, रूट यांच्याकडे वेस्ट इंडिजसाठी पर्याय आहेत आणि वेगवान गोलंदाज शकीब महमूद आणि वेगवान गोलंदाज मॅथ्यू फिशर या खेळाडूंनाही या मालिकेदरम्यान संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेमध्ये इंग्लंड सध्या नवव्या स्थानावर आहे आणि वेस्ट इंडिज फक्त एक स्थान पुढे आहे.
महत्वाच्या बातम्या-
Ranji Trophy: तमिळनाडूसाठी जुळ्या भावांचा एकत्रच शतकी दणका, तर दिग्गजांकडून निराशा
‘या’ राज्यात सुरू होतेय देशातील पहिलीच महिला क्रिकेट अकादमी, विनाशुल्क पुरवल्या जातील सुविधा