---Advertisement---

निकोलस पूरनने ठोकले टी 20 क्रिकेटमध्ये पहिले वादळी शतक; गयाना वॉरियर्सने सेंट किट्सला चारली धूळ

On: सोमवार, ऑगस्ट 31, 2020 4:11 PM
---Advertisement---

मुंबई । कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल 2020) च्या या हंगामात पहिले शतक पहायला मिळाले. सेंट कीट्स एंड नेविस पॅट्रियट विरुद्धच्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना अमेझॉन गयाना वॉरियर्सचा फलंदाज निकोलस पुरनने हे वादळी शतक लगावले. यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरनने 45 चेंडूत नाबाद 100 धावांची खेळी करून सर्वांना चकित केले. या खेळीत पूरनने 4 चौकार आणि 10 षटकार लगावले.

निकोलस पूरनचे टी -20 कारकिर्दीतील पहिले शतक ठरले. या शतकाच्या जोरावर शनिवारी (30 ऑगस्ट) झालेल्या सामन्यात, गयाना अमेझॉन वॉरियर्सने, सेंट कीट्स एंड नेविस पॅट्रियट संघाला 21 चेंडू आणि तीन गडी राखून पराभूत केले.

151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वॉरियर्सने 25 धावांत तीन गडी गमावले. यानंतर पूरनने 45 चेंडूत चार चौकार आणि दहा षटकारांच्या मदतीने नाबाद 100 धावा केल्या. चौथ्या विकेटसाठी रॉस टेलर (25) याच्यासह त्याने चौथ्या विकेटसाठी 11.5 षटकांत 128 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

तत्पूर्वी, पॅट्रियट्सने प्रथम फलंदाजी करताना जोशुआ डासिल्वाच्या 59 आणि दिनेश रामदिनच्या नाबाद 37 धावांच्या मदतीने 5 बाद 150 धावा केल्या. सात सामन्यांमधील वॉरियर्सचा हा तिसरा विजय आहे, तर पॅट्रियट सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

दुसर्‍या सामन्यात सेंट लुसिया जॉक्सने आपल्या कमी धावसंख्येचा यशस्वीपणे बचाव केला आणि बार्बाडोस ट्रायडर्सचा तीन धावांनी पराभव केला. सेंट लुसिया जॉक्सचा सात सामन्यांमधील पाचवा विजय आहे. बार्बाडोसने नाणेफेक जिंकून सेंट लुसियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यांना 18 षटकांत विरोधी संघाला 92 धावांवर सर्वबाद केले. सेंट लुसियाच्या केवळ तीन फलंदाजाना दुहेरी आकडा गाठता आला. बार्बाडोसकडून हेडन वॉल्शने तीन आणि रेमन रीफरने दोन गडी बाद केले.

बार्बाडोसच्या समोर एक छोटेसे आव्हान होते. सलामीचा फलंदाज जॉन्सन चार्ल्सने 42 चेंडूत 39 धावा करुनही त्यांचा संघ निर्धारित 20 षटकांत 7 बाद 89 धावा करू शकला.  सेंट लुसियाकडून केसरिक विल्यम्स आणि जेव्हल ग्लेन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. बार्बाडोसला शेवटच्या षटकात नऊ धावांची गरज होती, पण रोस्टन चेसने या षटकात केवळ पाच धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

दुबईमध्ये हातात बॅट घेताच विराट कोहली घाबरला; जाणून घ्या काय होते कारण

श्रेयस अय्यरने सांगितले हे काम केल्यावर दिल्ली कॅपिटलची टीम होणार चॅम्पियन

‘ही’ गोष्ट घडली नसती तर एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला नसता

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---