सध्या इंग्लंडमध्ये टी-२० ब्लास्ट स्पर्धा सुरू आहे. रविवारी (१९ जून) डर्बिशायर आणि बर्मिंघम बीयर्स संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहिला गेला. या सामन्यात एक घटना घडली, ज्यामुळे बर्मिंघम बीयर्स संघाला पाच धावांचा तोटा सहन करावा लागला. सामन्यात गोलंदाजी करणाऱ्या कार्लोस ब्रेथवेट आणि मैदानी पंच यांच्यातील वातावरण तापल्याचे पाहिले गेले.
वेस्ट इंडीज संघाला टी-२० विश्वचषक जिंकवून देणारा अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेट (Carlos Brathwaite) गोलंदाजी करत होता. स्ट्राईकवर असलेल्या वेन मॅडसेन त्याचा चेंडू व्यवस्थित पद्धतीने खेळला. पण ब्रेथवेटने तो चेंडू पकडून मॅडसेनलाच माघारी मारला. हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खेळपट्टीवर देखील यामुळे चांगलाच गोधळ झाला होता.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या डर्बीशायर संघासाठी १३ व्या षटकात ब्रेथवेट गोलंदाजीसाठी आला. त्याने एक चांगला गुड लेंथ चेंडू टाकला, ज्यावर मॅडसेनने फॉरवर्ड डिफेंसिव स्ट्रोक मारला. बर्मिंघम बीयर्सचे नेतृत्व करणाऱ्या ब्रेथवेटने क्षणाचाही विलंब न करता चेंडू पकडला आणि स्टंप्सवर मारला. परंतु चेंडू स्टंम्पला लागण्याऐवजी फलंदाजाच्या डाव्या पायाला जाऊन लागला.
Not ideal for Carlos Brathwaite 😬
A 5-run penalty was given against the Bears after this incident…#Blast22 pic.twitter.com/pXZLGcEGYa
— Vitality Blast (@VitalityBlast) June 19, 2022
ब्रेथवेटने मारलेला चेंडू लागल्यानंतर मॅडसेनने यावर आक्षेप घेतला. ब्रेथवेटने देखील लगेच माफी मागीतली, पण तरीदेखील त्याला या थ्रोमुळे नुकसान सोसावे लागलेच. मैदानातील पंच्यासोबत चर्चा करून लगेच बीयर्स संघावर ५ धावांची पेनल्टी लावली गेली. पंचांच्या या निर्णयावर ब्रेथवेट नाराज असल्याचे पाहिले गेले, पण पंच त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले.
ब्रेथवेटने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये २९ धावा खर्च करून १ विकेट घेतली. परंतु त्याला स्वतःच्या संघाला विजय मात्र मिळवून देता आला नाही. डर्बीशायरने हा सामना ७ विकेट्सने जिंकला. बर्मिंघम संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. पण कर्णधार ब्रेथवेट फलंदाजीमध्येही काही खास योगदान देऊ शकला नाही. त्याने १४ चेंडूत १८ धावा केल्या. डर्बीशायरला मिळालेल्या विजयात मॅडसेनची महत्वाची भूमिका राहिली. त्याने ३४ चेंडूत ५५ धावा केल्या. पाच चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने त्याने संघाला १८.१ षटकात विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिका सीरिजनंतर टी-२० विश्वचषकासाठी भक्कम बनला भारतीय संघ, वाचा सविस्तर
टी-२० विश्वचषकात संधी मिळण्यासाठी युवा खेळाडूंचे पारडे ठरतयं जड, रोहित-विराटचं टेंशन वाढणार?