पॅरिस। रविवारी (६ जून) फ्रेंच ओपन २०२२ स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने नॉर्वेच्या कॅप्सर रूडला पराभूत करत विजेतेपद आपल्या नावे केले. त्याने ६-३, ६-३, ६-० अशा फरकाने अंतिम सामन्यात रूडला पराभूत केले.
नदालचे (Rafael Nadal) हे फ्रेंच ओपनचे १४ वे विजेतेपद (14th Title in French Open) आहे. आत्तापर्यंत कोणालाही फ्रेंच ओपनमध्ये इतके विजेतेपद मिळवता आलेले नाही. तसेच त्याचे २२ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद (22nd Grand Slam Title) आहे. त्यामुळे तो एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू आहे. त्याच्यापाठोपाठ नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर आहे. या दोघांनीही प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
३६ वर्षीय नदाल हा फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात खेळणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वय असलेला खेळाडू देखील आहे. तसेच फ्रेच ओपन जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू देखील आहे. त्याने सर्वात पहिल्यांदा वयाच्या १९ व्या वर्षी २००५ फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले होते.
तर दुसरीकडे रूड यापूर्वी कधीही ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व सामन्यात देखील पोहचला नव्हता. तसेच नदालने जेव्हा पहिल्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकलेले तेव्हा रुड (Casper Ruud) केवळ ६ वर्षांचा होता. त्याचा नदाल हा आदर्श देखील आहे. विशेष गोष्ट अशी की, सप्टेंबर २०१८ पासून रूड नदालच्या मल्लोर्कामधील आकादमीमध्ये सराव करत आहे.
नदाल केवळ ३ सामने पराभूत
फ्रेंच ओपनमध्ये नदालची आकडेवारी शानदार राहिली आहे. त्याला केवळ ३ सामन्यात आजवर फ्रेंच ओपनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यातील दोनवेळा तो नोवाक जोकोविचकडून आणि एकवेळा रॉबिन सोडर्लिंग यांनी त्याला पराभूत केले आहे. त्याने तब्बल ११२ सामने या ग्रँडस्लॅम स्पर्धेत जिंकले आहेत.
त्याने २००५, २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१७, २०१८, २०१९, २०२० आणि २०२२ या १४ वर्षी फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
फ्रेंच ओपनच्या सेमिफायनलचा सामना थांबला काही काळासाठी, जाणून घ्या कारण
विक्रमवीर ‘राफाʼ..! दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने पटकावले १४वे विक्रमी विजेतेपद
नदालने १४व्यांदा मारली French Openच्या फायनलमध्ये धडक, तरीही का झाला निराश?, कारण खूपच धक्कादायक