---Advertisement---

VIDEO: डिवायडरला धडकून हवेत उडाली कार! रिषभ पंतच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Rishabh Pant accident
---Advertisement---

भारताचा स्टार विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत याचा शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटे मोठा कार अपघात झाला.  हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला ज्यामधून तो थोडक्यात बचावला आहे. यामध्ये त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारची गती किती प्रचंड होती, हे कळते. कारण ज्या स्पीडने गाडी एका रस्त्यावरून डिवाइडरला धडकत पलीकडे गेली, यावरून त्याच्या गाडीची गती 130च्या पुढे असल्याचा अंदाज लावला जात आहे. तो मर्सिडिज चालवत होता आणि त्याने सिटबेल्टही लावले नव्हते, अशी माहिती समोर येत आहे. तेव्हा त्याचा डोळा लागला आणि गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी डिवायडरला धडकली आणि पेट घेतला. तेव्हा तो विंड स्क्रीन तोडून बाहेर आला.

पंतची कार मर्सिडीज होती की बीएमडब्ल्यू याबाबत संभ्रमता होती, मात्र पोलिसांनी तो मर्सिडीज चालवत होता, असे सांगितले. ही कार देशातील सर्वोत्तम आणि लग्झरी कारपैकी एक असू शकते परंतु तिच्या क्रॅश होण्याच्या चाचण्यांचे परिणाम समाधानकारक नाहीत.

पंत रात्री उशिरा दिल्लीहून रुरकीच्या (उत्तराखंड) दिशेने त्यांच्या कारमधून एकटाच निघाला होता. तो त्याच्या आईला सरप्राईज देण्यासाठी जात होता. तेव्हा ही घटना घडली. इएसपीएन क्रिकइन्फोनुसार, त्याचा पहिला एक्स-रे समोर आला असून त्यामध्ये त्याच्या पायाला फ्रॅक्चर असून त्याच्या शरीरावर भाजलेले डाग नाहीत. तो स्थिर असल्याचे दिल्ली क्रिकेटच्या सचिवांनी पीटीआयला माहिती दिली.

पंतच्या डोक्याला व पाठीवर जखमा झाल्या आहेत. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याच्या कारने धडक मारताच पेट घेतला असे सांगितले आणि ती आग मोठ्या कष्टाने आटोक्यात आणली गेली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतच्या अपघाताचे कारण आले समोर, डॉक्टरांनी प्रकृती स्थिर असल्याचा दिला रिपोर्ट
‘तो’ दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---