---Advertisement---

पुण्यात रंगणार सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग; कलाकार, नेते आणि क्रिकेटपटूंचा उत्साह

On: सोमवार, जून 9, 2025 11:28 AM
---Advertisement---

जुलै महिन्यात पुण्यात एक विशेष सोहळा रंगणार आहे. सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग 2025! या लिगचे उद्घाटन नुकतेच पुण्यात मोठ्या दिमाखात पार पडले. या निमित्ताने शहरातील लोकप्रिय कलाकार, राजकीय नेते, आणि क्रीडाजगतातील मान्यवर एकत्र आले.

या भव्य सोहळ्याला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नाना भानगिरे, माजी क्रिकेटपटू केदार जाधव, राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे, अभिनेत्री संगीता तिवारी, अभिनेते प्रवीण तरडे, रमेश परदेशी आणि मालिकांतून प्रसिद्ध झालेले हार्दिक जोशी हे विशेष उपस्थित होते. यांच्यासह पुणे व महाराष्ट्रातील विविध कलाक्षेत्रातील अनेक नवोदित आणि प्रसिद्ध कलाकारांनीही सहभाग नोंदवला.

या लीगचे उद्दिष्ट फक्त मनोरंजन नसून, कलाकारांमध्ये एकात्मता, आरोग्याबाबत जागरूकता आणि सामाजिक सलोखा वाढवणे हे देखील आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपली कला विसरून कलाकार कशी धमाल उडवतात, याचे प्रत्यंतर या स्पर्धेद्वारे रसिकांना येणार आहे.

कार्यक्रमात केदार जाधव व हार्दिक जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी “कलाकार एकत्र आले की काहीतरी खास घडते,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

Box Cricket League 2025 ही केवळ एक स्पर्धा नसून कलाकारांमधील मैत्री, उत्साह आणि सकारात्मकतेचा उत्सव ठरणार आहे. जुलैमध्ये रंगणार्‍या या लीगची सर्वांनाच आतुरता लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---