मेलबर्न। क्रिकेटमध्ये २६ डिसेंबरला होणाऱ्या क्रिकेट सामन्यांना एक वेगळेच महत्त्व असते. या दिवशी होणाऱ्या कसोटी सामन्यांना बॉक्सिंग डे सामना म्हणून ओळखले जाते. याचा संबंध नाताळाच्या दुसऱ्या दिवशी उघडण्यात येणाऱ्या ‘ख्रिसमस बॉक्स’शी (नाताळाची भेट) आहे. गेले ४१ वर्षे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर नियमितपणे या दिवशी क्रिकेट सामने होत असतात. गेल्या ४१ वर्षांत मेलबर्न येथे तब्बल ४० कसोटी सामने २६ डिसेंबरला सुरु झाले आहेत.
त्यातील सध्या सुरु असलेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचाही समावेश आहे. हा सामनाही शनिवारी (२६ डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झाला असून या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने खास विक्रमही केला आहे.
रहाणे ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शतक करणाऱ्या एकूण ५ भारतीय खेळाडूंपैकी एक आहे. यात त्याच्यासह सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे मेलबर्नवर बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात २ वेळा शतकी खेळी करणारा तो पहिला आणि एकमेव भारतीय खेळा़डू आहे. त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणालाही अशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने यापूर्वी सन २०१४ ला मेलबर्न येथे १४७ धावांची खेळी साकारली होती.
रहाणेने रविवारी(२७ डिसेंबर) दिवसाखेर २०० चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने १२ चौकार मारले. एवढेच नाही तर त्याने रवींद्र जडेजासह ६ व्या विकेटसाठी नाबाद १०४ धावांची भागीदारीही रचली. जडेजा दिवसाखेर ४० धावांवर नाबाद आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत शतके करणारे भारतीय –
सचिन तेंडुलकर – १९९९ (११६ धावा)
विरेंद्र सेहवाग – २००३ (१९५ धावा)
विराट कोहली – २०१४ (१६९ धावा)
अजिंक्य रहाणे – २०१४ (१४७ धावा)
चेतेश्वर पुजारा – २०१८ (१०६ धावा)
अजिंक्य रहाणे – २०२० (१०४*धावा)
महत्त्वाच्या बातम्या –
NZ vs PAK : पहिल्या डावात न्यूझीलंडचा ४३१ धावांचा डोंगर, प्रत्युत्तरात पाकिस्तानची अडखळती सुरुवात
पाहुणा नंबर १..! मेलबर्नच्या मैदानावर ‘अशी’ कामगिरी करणारा अजिंक्य रहाणे पहिलाच परदेशी क्रिकेटर