---Advertisement---

कुलदीप यादवच्या वाढदिवसानिमित्त चहलने व्हिडिओ शेअर करत मागितली माफी; म्हणाला, ‘याच्यासाठी…’

On: गुरूवार, डिसेंबर 14, 2023 6:01 PM
Kuldeep And Chahal
---Advertisement---

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 17 डिसेंबरपासून वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी युजवेंद्र चहल याचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. चहल बराच काळ संघाबाहेर होता. चहल दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. आफ्रिकेत पोहोचताच त्याने कुलदीप यादव याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. आज (14 डिसेंबर) कुलदीपचा वाढदिवस आहे. चहलने कुलदीपसोबतचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.

वास्तविक, युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्यासोबतचा एक डान्स व्हिडिओ ट्टिटरवर वर शेअर केला आहे. त्याने व्हिडिओ शेअर करत कुलदीपला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्याने हॅशटॅग वापरून व्हिडिओ शेअर केल्याबद्दल माफीही मागितली आहे. कुलदीप आणि चहलची जोडी काही काळासाठी भारतीय संघासाठी खूप फायदेशीर ठरली आहे. या दोघांमुळे भारताने अनेक सामने जिंकले. या दोघांना पुन्हा एकदा एकत्र खेळण्याची संधी मिळू शकणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सध्या खेळली जात आहे. त्याचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. आता तिसरा सामना खेळवला जाणार आहे. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. त्यातील पहिला सामना 17 डिसेंबरला तर दुसरा सामना 19 डिसेंबरला होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. ही मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. (Chahal apologizes by sharing video on Kuldeep Yadav’s birthday Said For this video)

हेही वाचा

IND vs SA । कसोटी मालिकेतून शमीचा पत्ता कट! समोर आली महत्वाची माहिती
तिसऱ्या टी20त सूर्याकडे विराटचा ‘तो’ जबरदस्त Record मोडण्याची संधी, हवेत फक्त ‘एवढे’ षटकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---