आशिया चषक 2023 साठी भारतीय संघ समोर आला आहे. सोमवारी (21 ऑगस्ट) कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांची बैठक पार पाडली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन आशिया चषकासाठी संघ घोषित केला गेला. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू आशिया चषकासाठी संघात पुनरागमन करणार आहेत. पण फिरकीपटू युझवेंद्र चहल याचे नाव यावेळीही संघात सामील केले गेले नाही.
युझवेंद्र चहल () भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने संघासाठी सर्वाधिक 96, तर वनडे क्रिकेटमध्ये 121 विकेट्स घेतल्या आहेत. असे असले तरी, आशिया चषक 2023 साठी त्याला भारतीय संघात संधी मिळाली नाहीये. चहलने शेवटचा वनडे सामना जानेवारी 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो वनडे संघात स्थान मिळवू शकला नाहीये. आशिया चषकासाठी निवडलेला हा संघ आघामी वनडे विश्चषकासाठी जवळपास निश्चित मानला जात आहे. अशात आगामी वनडे विश्चषकात देखील चहलला संधी मिळण्याची शक्यता कुठेच दिसत नाही.
दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा चहलला महत्वाच्या स्पर्धेसाठी संघात स्थान मिळाले नाहीये. आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 पासून तो अशा महत्वाच्या स्पर्धांना मुकत आला आहे. 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात देखील चहलला संधी मिळाली नव्हती. अशातच आता यावर्षीचा आशिया चषकातून त्याचे नाव वगळण्यात आले आहे. येत्या काळात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात देखील चहल संघातून बाहेरलच असण्याची पूर्ण शक्यता आहे.
दरम्यान, आशिया चषकासाठी निवडलेल्या संघांतील प्रमुख गोष्टी पाहिल्या, तर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचे पुनरागमन झाले आहे. संजू सॅमसन याला राखीव खेळाडू म्हणून संघात घेतले गेले आहे. तसेच फिरकीपटू रविचंद्रन अश्वन यालाही संघात संधी मिळाली नाहीये. (Chahal has been dropped from the Asia Cup 2023 squad)
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू – संजू सॅमनस
महत्वाच्या बातम्या –
अखेर चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला! आशिया चषकासाठी राहुल अणि अय्यरचे संघात कमबॅक
BIG BREAKING! आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा, प्रमुख फलंदाजांचे संघात पुनरागमन