---Advertisement---

दुसऱ्या वनडे दरम्यान मैदानातच फिंच- केएल राहुलची मस्ती, पाहा व्हिडिओ

On: रविवार, नोव्हेंबर 29, 2020 11:10 AM
---Advertisement---

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात रविवारी(२९ नोव्हेंबर) दुसरा वनडे सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यासामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच आणि भारताचा यष्टीरक्षक केएल राहुल मस्ती करताना दिसले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

झाले असे की भारताकडून १२ व्या षटकात नवदीप सैनी गोलंदाजी करत होता. यावेळी त्याने पाचवा चेंडू जवळपास ताशी १४५ किमी. वेगाने टाकला. हा चेंडू फलंदाजी करत असलेल्या फिंचच्या पोटाला लागला. त्यामुळे फिंच वेदनेने कळवळला.

त्याचवेळी तो ठिक आहे का पाहण्यासाठी त्याचा फलंदाजी साथीदार डेविड वॉर्नर तसेच भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि केएल राहुल तेथे आहे. यावेळी राहुल फिंचच्या पोटाला हात लावून त्याची मस्करी करताना दिसला. ज्यावर फिंच आणि केएल राहुल खळखळून हसातानाही दिसले. त्यांना हसताना पाहून फिंचची दुखापत गंभीर नसल्याचे दिसून आले.

फिंच आणि वॉर्नरने या सामन्यात अर्धशतके करत सलग दुसऱ्यांदा भारताविरुद्ध शतकी भागीदारी केली आहे. त्या दोघांनी १४२ धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी रचली. फिंचने ६९ चेंडूत ६० धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

अफलातून! दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडच्या २३ वर्षीय फलंदाजाने शतकी खेळीसह केला भारी रेकॉर्ड

पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज

“रवींद्र जडेजासारखे खेळाडू वनडेसाठी योग्य नाही”, मांजरेकरांची पुन्हा टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---