---Advertisement---

चहल, अय्यर, दुबेसह डान्स करणारा तो खेळाडू नक्की आहे तरी कोण?

On: रविवार, फेब्रुवारी 2, 2020 2:42 PM
---Advertisement---

शुक्रवारी (31 जानेवारी) वेलिंग्टन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना पार पडला. हा सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकत मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली.

सलग 4 सामन्यांत विजय मिळाल्याने भारताचा आत्मविश्वास दुप्पटीने वाढला आहे. त्यांचा हा आत्मविश्वास केवळ मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही दिसत आहे. हॅमिल्टन आणि वेलिंग्टन येथे सलग 2 सामन्यांत भारतीय संघाने न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. यामुळे टी20मध्ये प्रथमच भारतीय संघ न्यूझीलंड संघाला 5-0 ने पराभूत करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

वेलिंग्टनमधील विजयानंतर भारतीय संघात जल्लोषाचे वातावरण पहायला मिळाले. या विजयाचा जल्लोष भारतीय संघातील काही खेळाडूंनी अनोख्या अंदाजात साजरा केला. सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असणाऱ्या युजवेंद्र चहलने भारतीय संघाबरोबर डान्स करतानाचा एक टिक-टॉकचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

ज्यामध्ये भारताचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल हा शिवम दुबे, श्रेयस अय्यर आणि आणखी एका भारतीय खेळाडूबरोबर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

युजवेंद्र चहलच्या या व्हिडिओमध्ये हे चारही खेळाडू एकत्र नाचत आहेत. व्हिडिओमध्ये चहल आणि श्रेयस अय्यर समोर उभे आहेत तर शिवम दुबे मागे उभा आहे. तसेच एक टोपी घालून डोके खाली करत श्रेयस अय्यरच्या मागे उभा राहून नाचत आहे.

त्यामुळे तो खेळाडू नक्की कोण आहे याबद्दल चाहत्यांनी विविध अंदाज वर्तवले आहेत. पण अनेकांनी हा खेळाडू रोहित शर्माच असल्याचे म्हटले आहे. मात्र अजून तो खेळाडू कोण आहे हे स्पष्ट झालेले नाही.

https://twitter.com/Rockykiccha45/status/1223463923229151233

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---