इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. दरम्यान श्रीलंका संघाचा अष्टपैलू खेळाडू चमिका करूनारत्नेवर देखील मोठी बोली लागली आहे.
श्रीलंका संघासाठी विस्फोटक फलंदाजी आणि अप्रतिम गोलंदाजी करणारा विस्फोटक फलंदाज चमिका करूनारत्ने पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा खेळताना दिसून येणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला ५० लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. तसेच आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ मध्ये बोली लागणारा तो चौथा श्रीलंकन खेळाडू ठरला आहे.
अशी राहिली आहे कारकीर्द
चमिका करूनारत्नेने आतापर्यंत एकूण १५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ८८ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने ९ गडी बाद केले आहेत. तसेच ४८ टी२० सामन्यात त्याने ३४८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये गोलंदाजी करताना त्याने २९ गडी बाद केले आहेत. तो आगामी हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मोलाची भूमिका पार पाडू शकतो.
महत्वाच्या बातम्या :
विंडीजच्या ‘या’ गोलंदाजासाठी चेन्नई- मुंबईही भिडले, पण हैदराबादने ७.७५ कोटी मोजत मारली बाजी
यूपीच्या अष्टपैलूवर गुजरात टायटन्सने लावला डाव, तब्बल ३.२० कोटींची किंमत केली खर्च
डेवन कॉन्वेचा चेन्नईमध्ये प्रवेश !! तब्बल इतक्या कोटींची लागली बोली