श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज चमिंडा वास याने एका मुलाखतीमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि बाबर आझम या खेळाडूंवर मोठे वक्तव्य केले आहे. वास याने बाबरला वर्तमानात जगातील नंबर एकचा फलंदाज असल्याचे सांगीतले. तसेच त्याने सचिन आणि विराट यांच्या विक्रमांवरही आपले मत मांडले आहे.
श्रीलंकेमध्ये लंका प्रीमीयर लीग (एलपीएल) चालू आहे. चमिंडा वास (Chaminda Vaas) हा कोलंबो स्ट्रायकर्स या संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक असून, याच संघातून बाबर आझम (Babar Azam) एलपीएल खेळतोय.
माध्यमांशी बोलताना वासला प्रश्न विचारला की, बाबर आझम एक दिग्गज खेळाडू असून देखील त्याला कर्णधारपद का दिले नाही? यावर श्रीलंकन मीजी गोलंदाजने सांगीतले, “बाबर आझम याने कर्णधार न होता फक्त फलंदाज म्हणून खेळण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे आम्ही त्याचा आदर केला. निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) हा संघाचा कर्णधार असणार आहे. जर तुम्ही बाबरचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहित आहे की, तो सध्या जगातील नंबर 1चा फलंदाज आहे. त्याची पाकिस्तान संघासाठी कामगिरी आणि योगदान खूप मोठे आहे. त्याच्याकडून तरुणांना खूप काही शिकण्यासारखे आहे. बाबरला एलपीएल मध्ये खेळताना पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” असे वास म्हणाला.
सचिन तेंडूलकर आणि विराट यांच्याबद्दल वास याने केलेले वक्तव्य
पुढे वासला महान फलंदाज सचिन तेंडूलकरच्या (Sachin Tendulkar) विक्रमाविषयी विचारण्यात आले असता तो म्हणाला की, “विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात. तुम्ही ते विक्रम कायमचे जपून ठेवू शकत नाही. काळ बदलत राहणार आहे, नविन खेळाडू येणार आहे. यामुळे खेळ देखील बदलत राहणार आहे. माझ्या मते विराट कोहली (Virat kohli) अजूनही तरुण आहे आणि त्याला भरपूर वेळ मिळाला आहे. तो हा विक्रम मोडू शकतो. तो ज्या प्रकारे भारतीय संघासाठी कामगीरी करत आहे मला खात्री आहे की तो भारतीय संघाला एक वेगळ्या स्थरावर घेऊन जाईल. भारताने अनेक पिढ्या उत्कृष्ट क्रिकेटपटू उदयास आणल्याचे आपण पाहिले आहे.” असे वास म्हणाला. (chaminda vaas says babar azam is best batsman in the world as compares virat kohli and sachin tendulkar)
महत्वाच्या बातम्या:
मानलं जिद्दीला! जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर रिषभ फिटनेसच्या जवळ! चोपतोय 140 KMPH चे चेंडू
मुकेशचा विषयच निराळा! एकाच दौऱ्यावर राडा करत मोडला पाकिस्तानी क्रिकेटरचा भलामोठा रेकॉर्ड, वाचाच