भारतात चालू असलेलला वनडे विश्वचषक 2023 जेव्हा संपेल तेव्हा गुणतालिकेतील 7 संघ थेट 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरतील. यासह, यजमान पाकिस्तान आपोआप पात्र ठरेल. 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिले 8 देश एकमेकांना भिडताना दिसतील.
एका आयसीसी प्रवक्त्याने इएसक्रिकइन्फोवर बोलताना सांगितले की, “2025 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता प्रणालीला 2021 मध्ये आयसीसी क्रिकेट बोर्डाने मान्यता दिली होती. त्यानंतर 2024-31 च्या काळात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाईल आणि ती आठ देशांदरम्यान खेळवली जाईल असे ठरले आहे.”
काही क्रिकेट मंडळांसाठी हे आश्चर्यकारक आहे. भारतातील विश्वचषक स्पर्धेत काही संघांची अवस्था वाईट आहे तर काही संघ पात्रताही मिळवू शकलेले नाहीत. या देशांच्या बोर्डांनी क्रिकइन्फोला सांगितले की, “त्यांना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी पात्रतेबद्दल माहिती नाही.” सध्या, बांगलादेश आणि इंग्लंड एकदिवसीय विश्वचषकाच्या गुणतालिकेत अनुक्रमे 9व्या आणि 10व्या स्थानावर आहेत. हे दोन्ही देश टॉप-7 मधून बाहेर पडले आहेत. यजमान पाकिस्तानसह इतर संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरतील.
याचा अर्थ वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि आयर्लंड सारख्या देशांना या स्पर्धेसाठी पात्र होण्याची संधी देखील मिळणार नाही कारण हे देश 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात प्रवेश करू शकले नाहीत.
नोव्हेंबर 2021 मध्ये आयसीसीने 2024-31 काळामधील पुरुष आणि महिला जागतिक स्पर्धा जाहीर केल्या आहेत, ज्यात 2025 आणि 2029 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दोन आवृत्त्यांचा समावेश आहे. आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी आठ देशांदरम्यान खेळली जाईल आणि त्याचे वेळापत्रक मागील स्पर्धेसारखेच असेल, जिथे संघांना दोन गटांमध्ये विभागले जाईल आणि नंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळली जाईल. (Champions Trophy 2025 qualification hanging over England could fall out of the qualifiers)
म्हत्वाच्या बातम्या
नामुष्कीजनक पराभवानंतर बटलर म्हणतोय, “आज अपेक्षा होती मात्र भारतीयांनी…”