आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. अशा परिस्थितीत चाहते टीम इंडियाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या स्पर्धेपूर्वी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळेल. एकदिवसीय मालिकेसाठी जाहीर होणाऱ्या संघातील बहुतेक खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील. दरम्यान, टीम इंडियाच्या संघाच्या घोषणेबाबत एक मोठी अपडेट आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 12 जानेवारीपर्यंत भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते असे मानले जात होते. परंतु आता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती त्यात विलंब करू शकते. ते संघ घोषणेची अंतिम तारीख वाढवण्याची विनंती करू शकतात. मात्र, आगामी पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे
आयसीसी स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या संघांना त्यांचे तात्पुरते संघ किमान एक महिना आधी जाहीर करावे लागते. तथापि, या संघात बदल करण्यास परवानगी असते. पण यावेळी आयसीसीने सर्व संघांना पाच आठवडे आधीच त्यांचे संघ जाहीर करण्यास सांगितले आहे. भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. जिथे टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका खेळली आहे. या मालिकेचा संदर्भ देत बीसीसीआयकडून अधिक वेळ मागण्याची अपेक्षा आहे. टीम इंडियाची घोषणा सुमारे एक आठवड्यानंतर, 18-19 जानेवारीच्या दरम्यान केली जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय संघ त्यांचे सर्व सामने यूएईमध्ये खेळेल.
हेही वाचा-
रवींद्र जडेजा कसोटीतून घेणार निवृत्ती? इंस्टाग्राम स्टोरीमुळे चर्चांना उधाण
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अनुभवी फलंदाजाची निवृत्ती, संघाला मोठा धक्का
“रिषभ पंत प्रत्येक डावात शतक करू शकतो” माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य