---Advertisement---

‘310 भारतीय रुपये’, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या तिकिट विक्रीची तारीख जाहीर

On: मंगळवार, जानेवारी 28, 2025 9:08 AM
---Advertisement---

चाहते चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण ही मोठी स्पर्धा 8 वर्षांनी पुन्हा होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे आयोजन करत आहे. परंतु ही सपर्धा हायब्रिड मॉडेलद्वारे खेळवली जाईल. ज्यात टीम इंडियाचे सर्व सामने यूएईच्या भूमीवर होणार आहेत. पाकिस्तानमध्ये 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने कराची, रावळपिंडी आणि लाहोरच्या मैदानावर खेळवले जातील. आता पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सर्व सामन्यांची तिकिटे कधी उपलब्ध होतील याची माहिती समोर आली आहे.

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. या सर्वांची तिकिटे आज 28 जानेवारीपासून पाकिस्तान वेळेनुसार दुपारी 2 वाजता उपलब्ध असतील. क्रिकेट चाहते दुसऱ्या उपांत्य फेरीसह 10 सामन्यांसाठी तिकिटे खरेदी करण्यासाठी नोंदणी करू शकतील. दरम्यान, आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी किमान तिकिटांची किंमत 1000 पाकिस्तानी रुपये (अंदाजे भारतीय 310 रुपये) निश्चित केली आहे आणि ‘प्रीमियम सीटिंग’ तिकिटांची किमान किंमत 1500 पाकिस्तानी रुपये (अंदाजे भारतीय 465 रुपये) पासून सुरू होईल. याचा अर्थ चाहत्यांना कमी पैसे खर्च करून स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याची संधी मिळेल. तर 9 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याची तिकिटे दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्याच्या समाप्तीनंतर खरेदीसाठी उपलब्ध असतील.

आयसीसीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी अनुराग दहिया म्हणाले की, आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी अधिकृत तिकिटांची विक्री जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. 1996 नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धा आयोजित करणाऱ्या पाकिस्तानमधील क्रिकेटसाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे संचालक सुमैर अहमद सय्यद म्हणाले की, परवडणाऱ्या तिकिटांच्या किमतींमुळे सर्व क्षेत्रातील चाहते या ऐतिहासिक स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ज्यामुळे क्रिकेट प्रेमींच्या सर्व पिढ्यांसाठी हा उत्सव साजरा केला जाऊ शकतो. आम्ही तिकिटे केवळ परवडणारीच नाहीत तर अधिकृत ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि पाकिस्तानमधील 100 हून अधिक आउटलेट्सद्वारे देखील उपलब्ध करून दिली आहेत. भारताच्या सामन्यांच्या तिकिटांची माहिती नंतर उपलब्ध करून दिली जाईल.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी गट टप्पा:

गट अ: पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश

गट ब: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान

हेही वाचा-

रणजी ट्राॅफीच्या शेवटच्या लीग सामन्यात नाही खेळणार रोहित, जयस्वालसह ‘हे’ स्टार खेळाडू
विराट कोहली ‘या’ दिग्गजाच्या नेतृत्वात खेळला होता शेवटचा रणजी सामना, यंदा हा खेळाडू कर्णधार
13 वर्षांनंतर रणजीमध्ये विराट कोहलीचे कमबॅक, या संघाविरुद्ध अ‍ॅक्शनमध्ये दिसणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---