माजी भारतीय कसोटी सलामीवीर आकाश चोप्राने रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही विराट, रोहित आणि जडेजासाठी शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते असं आकाश चोप्राला वाटतं. तो म्हणाला की पुढील आयसीसी स्पर्धा ज्यामध्ये हे तिघेही भाग घेऊ शकतात ती दोन वर्षांनी होईल. तिघेही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. अशा परिस्थितीत, 19 फेब्रुवारीपासून सुरू होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी ही या तिन्ही दिग्गजांसाठी शेवटची आयसीसी स्पर्धा ठरू शकते.
पाकिस्तान आणि दुबई येथे खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत टीम इंडिया बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसह ग्रुप अ मध्ये आहे. टीम इंडियाला या स्पर्धेत पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळायचा आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना, आकाश चोप्रा म्हणाला, “जड अंतःकरणाने मी म्हणतोय की, ही स्पर्धा दिग्गज खेळाडूंसाठी शेवटची असण्याची शक्यता आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे आणि त्यानंतर, या वर्षी आणखी एक आयसीसी स्पर्धा होईल, जी WTC (जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा) फायनल आहे, पण आपण तिथे पोहोचलो नाही. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यापैकी कोणीही त्यात खेळणार नाही.”
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “WTC नंतर, पुढच्या वर्षीचा आयसीसी कार्यक्रम टी20 विश्वचषक आहे, परंतु तिघेही त्या फॉरमॅटमधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे तिघेही तिथे खेळणार नाहीत. एकदिवसीय विश्वचषक 2027 मध्ये होईल, जो थोडा दूर आहे. 2027 पर्यंत जग खूप वेगळे दिसेल. मला वाटते की खेळाडूंनाही वाटते की ही त्यांची शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते.” 2024 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत विजय मिळवल्यानंतर कोहली, विराट आणि जडेजा यांनी निवृत्तीची घोषणा केली. अशा परिस्थितीत, दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे आणि तंदुरुस्तीचा मुद्दा असणे देखील या खेळाडूंसाठी पुढे खेळण्यात अडथळा ठरू शकते.
हेही वाचा-
श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला लोळवले, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कांगारु संघाला 2-0 ने व्हाईटवाॅश!
WPL 2025 ची सनसनाटी सुरुवात, पहिल्याच सामन्यात धावांचा हाहाकार!
PAK vs NZ सामन्यात विक्रमी खेळी! या खेळाडूने रचला नवा इतिहास