---Advertisement---

एका भारतीयासह जगातील दिग्गज क्रिकेट संघ पाकिस्तानात होणार क्वारंटाईन?

On: सोमवार, ऑक्टोबर 12, 2020 5:49 PM
---Advertisement---

अष्टपैलू खेळाडू चामू चिभाभा पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी क्रिकेट मालिकेत झिंबाब्वेचा कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. २० सदस्यांच्या संघाची आज घोषणा झाली असून हा संघ ३० ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर दोन देशांत ३ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे.

२० ऑक्टोबर रोजी हा २० सदस्यीय संघ इस्लामाबादला पोहचणार आहे. २१ ते २७ ऑक्टोबर २०२० दरम्यान हा संघ रावळपिंडी येथे क्वारंटाईन होणार आहे. २८ व २९ ऑक्टोबर दरम्यान ते पिंडी येथेच सराव करणार आहेत.

एकदिवसीय मालिका मुलतान येथे होणार होती परंतू लॉजिस्टीक व इतर कारणांनी ती रावळपिंडी येथे हलविण्यात आली. ३० ऑक्टोबर, १ नोव्हेंबर व ३ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय मालिका तर ७, ८ व १० नोव्हेंबर रोजी टी२० मालिका होणार आहे.

संघाचे प्रशिक्षक लालचंद रजपूत हे देखील या दौऱ्यावर जाणार की नाही याबद्दल मात्र झिंबाब्वे बोर्डाने कोणताही खुलासा केला नाही. दुसऱ्या बाजूला ३४ वर्षीय चामू चिभाभाने २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले असून ३ कसोटी, १०४ वनडे व ३३ टी२० सामने खेळले आहेत. तो मध्यमगतीचा गोलंदाज आहे.

झिंबाब्वे संघ- चामू चिभाभा (कप्तान), फराज अकरम, रेयान बर्ल, ब्रायन चारी, तेंडाई चतरा, एल्टॉन चिंगुबुरा, तेंडाई चिसोरो, क्रेग इर्विन, तिनशे कामुनहुक्मवे, वेस्ले मधेवेरे, वेलिंगटन मसाकाद्जा, कार्ल मुम्बा, रिचमंड मुतुम्बामी, ब्लेसिंग मुजरबानी, रिचर्ड नगारवा, सिकंदर रजा, मिल्टॉन शुम्बा, ब्रेंडन टेलर, डोनाल्ड तिरिपानो, सीन विलियम्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---