बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघ एका विकेटने पारभूत झाला. बांगलादेशने 40व्या षटकात त्यांची 9वी विकेट गमावली होती. पण शेवटच्या 10 षटकांमध्ये भारतीय गोलंदाज शेवटची विकेट घेऊ शकले नाहीत. परिणामी बांगलादेशने एक विकेट आणि 4 षटके शिल्लक असताना विजय मिळवला. तत्पूर्वी भारतीय फलंदाज देखील अवघ्या 186 धावा करून बाद झाले. या सुमार प्रदर्शनाच्या परिणाम म्हणून संघाला पराभव स्वीकारावा लागला.
उभय संघांतील दुसरा वनडे सामना ढाकाच्या शेअ ए बांगला स्टेडियमवर खेळला जाणार आहे. बुधवारी (7 डिसेंबर) खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर सर्वांचे लक्ष असेल. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) दुसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे. शार्दुलला दुखापत झाल्याचे सध्या सांगितले जात आहे.
शार्दुल ठाकुर जर यर दुसऱ्या वनडे सामन्यात खेळला नाही, तर संघाला एका अष्टपैलू खेळाडूची कमी जाणवणार आहे. अशात संघ व्यवस्थापन आणि कर्णधार अक्षर पटेल (Axar Patel) याला शार्दुलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करू शकतात. असे असले तरी, संघ व्यवस्थापनाकडून याविषयी अद्याप कुठलीही ठोस माहिती मिळाली नाहीये. उभय संघांतील पहिल्या वनडे सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. संघ त्याच्या वाटाची 50 षटके देखील खेळू शकला नाही.
डावाच्या 42 व्या षटकात भारतीय संघ 186 धावा करून सर्वबाद झाला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला केएल राहुल सर्वाधिक 73 धावा करू शकला. वरच्या फळीतील रोहित शर्मा (27), शिखर धवन (7) आणि विराट कोहली (9) यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराज याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप सेने आणि वाशिंगटन सुंदर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स नावावर केल्या. (Chances of changing India’s playing eleven in the second ODI after the defeat! ‘Such’ will be the team)
दुसऱ्या वनडेसाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन –
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वाशिंगटन सुंदर, शाहबाज़ अहमद / अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर / उमरान मलिक, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितच्या नेतृत्वात पुन्हा इतिहास घडवणार? धोनीच्या नेतृत्वात 2015 मध्ये असा राहिलेला बांगलादेश दौरा
चित्तथरारक! कैफने 10 हजार फुटांच्या उंचीवरून मारली डाईव्ह, पाहून तुमचेही फिरतील डोळे