डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात चंदन शिवराज, तरुण कोरवार या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत भारताच्या चंदन शिवराज याने पाचव्या मानांकित हनु पटेलचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-6(6), 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आजचा दिवस गाजवला. तरुण कोरवार याने आठव्या मानांकित गगन विमलचा 6-1, 6-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अव्वल मानांकित अमन दहिया याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत विश्वसेनन नवनीथनचा 6-4, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली. भारताच्या अधिरीत आवळ याने अमेरिकेच्या वेंकट ऋषी बाटलंकीचे आव्हान 6-4, 6-7(5), 6-4 असे संपुष्टात आणले.
स्पर्धेचे उदघाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे, गद्रे मरीन एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे विभागीय विक्री व्यवस्थापक आश्विन जंगम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, क्लबच्या वित्तीय विभागाचे सचिव मिहीर केळकर, क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अश्विन गिरमे आणि आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: एकेरी:
मुले:
अमन दहिया (भारत) [1] वि.वि.विश्वसेनन नवनीथन (भारत)6-4, 6-1;
चिह एन हौ (तैपेई) [7]वि.वि.तेजस आहुजा(भारत)6-3, 6-1;
अलेक्झांडर डस्कालोविक (सर्बिया) [6]वि.वि.सिद्धार्थ माधवन(भारत) 6-1, 6-1;
दक्ष प्रसाद (भारत)[3]वि.वि.स्कंधा प्रसन्न राव(भारत)6-2, 6-3;
अधिरीत आवळ(भारत)वि.वि.वेंकट ऋषीबाटलंकी(अमेरिका)6-4, 6-7(5), 6-4;
तरुण कोरवार(भारत) वि.वि.गगन विमल(भारत)[8]6-1, 6-4;
बुशन होबाम(भारत)[4]वि.वि.देबासिस साहू(भारत) 6-7(7), 6-4, 7-6(3);
चंदन शिवराज(भारत)वि.वि.हनु पटेल(अमेरिका)[5] 3-6, 7-6(6), 6-4;
कांधवेल अकिलंडेश्वरी (भारत)वि. वि.आरव सम्राट हाडा (अमेरिका) 6-2, 6-2;
चुन तांग (तैपेई)वि.वि.अनुरव प्रकाश(भारत)6-0, 6-2;
वरुण वर्मा(भारत)वि.वि.शंकर हेसनम (भारत)6-0, 6-7(3), 6-3;
श्रीकेशव मुरुगेसन(अमेरिका) वि.वि.जय दीक्षित(भारत)6-2, 6-0;
एस. हितेश चौहान(भारत)वि.वि.सहजसिंग पवार(भारत)6-4, 7-5;
समर्थ सहिता(भारत)वि.वि. ओमर सुमर(भारत)3-6, 6-3, 6-4;
मुली:
हर्षिनी नागराज(भारत)वि.वि. सोफी बेकर(ग्रेट ब्रिटन)6-4, 6-4;
सुहिता मारुरी(भारत)[1]वि.वि.पवित्रा पारीख(भारत)6-2, 6-1;
लिडिया पॉडगोरिचानी(थायलंड)[4]वि.वि.नैनिका रेड्डी बेंद्रम (भारत)6-3, 6-1;
नियती कुकरेती(भारत)वि.वि. माया बुनियारूनेट(थायलंड)6-2, 6-1;
सई जान्हवी(भारत) वि.वि.चार्मी गोपीनाथ (भारत)0-6, 6-3, 6-2;
मधुरिमा सावंत(भारत)[3]वि.वि.हन्ना नागपाल(भारत)4-6, 6-0, 6-3;
तेजस्वी दबस(भारत) [6]वि.वि.सिद्धी खोत(भारत)6-0, 6-0.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नो नेमार नो चिंता! स्वित्झर्लंडला हरवत ब्राझिल अंतिम 16मध्ये दाखल, ‘हा’ मोठा विक्रम केला नावावर
एकमेवाद्वितीय! तब्बल 11 देशात कसोटी शतक करणारा पहिला क्रिकेटर