मध्य प्रदेश संघ २३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफी २०२१-२२च्या अंतिम सामन्यात पोहोचला आणि मुंबईवर ६ विकेट्सने सोपा विजय मिळवत त्यांनी इतिहास रचला. शुभम शर्मा मध्य प्रदेशच्या विजायाचा नायक राहिला. संघातील खेळाडूंबरोबरच अजून एका व्यक्तीचा मध्य प्रदेशच्या ऐतिहासिक विजयात वाटा राहिला. ते व्यक्ती आहे मध्य प्रदेश संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित.
मध्य प्रदेश संघ पहिल्यांदा १९९८-९९ मध्ये रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता, जेव्हा चंद्रकांत पंडित संघाचे कर्णधार होते. आता मोठ्या काळानंतर त्यांचा संघ पुन्हा एकदा अंतिम सामन्यात पोहचला आणि चंद्रकांत यावेळी संघाचे प्रशिक्षक होते.
चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) मध्य प्रदेश संघाच्या कर्णधारपदी असताना रणजी ट्रॉफी मिळवून देऊ शकले नाहीत. परंतु आता प्रशिक्षकाच्या रूपात त्यांनी ही कमाल केली आहे. सन १९९८-९९ रणजी हंगामात मध्य प्रदेश आणि कर्नाटक संघ आमने सामने होते. कर्नाटकने हा सामना ९६ धावांच्या अंतराने जिंकला होता. आता चंद्रकांत मध्य प्रदेशचे प्रशिक्षक आहेत आणि २३ वर्षांपूर्वी त्यांची जी इच्छा अपूर्ण राहिली होती, ती इच्छा यावर्षी त्यांनी पूर्ण केली आहे.
मागच्या २ वर्षांपूर्वी चंद्रकांत मध्य प्रदेशचे प्रशिक्षक बनले. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी संघाने त्यांना मोठी रक्कम दिली. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचा काही काळ मध्य प्रदेश संघ अपेक्षित प्रदर्श करत नव्हता, ज्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. परंतु जसा-जसा वेळ गेला, तशी संघाच्या प्रदर्शनात सुधारणा दिसू लागली. संघातील काही खेळाडू अनुभवी होते, पण ते चंद्रकांत यांच्या रणनीतीमध्ये फिट बसत नसल्यामुळे त्यांच्यातील काही जणांना संघातून बाहेर केले गेले. तर कही दिग्गज स्वतःहून संघातून बाहेर गेले.
Congratulations Madhya Pradesh on winning the #RanjiTrophy2022! We've witnessed some terrific performances throughout the season. Great efforts by everyone @BCCI for ensuring another successful Ranji season amidst the pandemic. pic.twitter.com/qMxmvUNYZf
— Jay Shah (@JayShah) June 26, 2022
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वत्कृष्ट प्रशिक्षकांमध्ये चंद्रकांत पंडित यांची गणना केली जाते. ते त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. संघातील सर्व खेळाडूंना मैदानात येताना स्वतःचा मोबाईल फोन एकाठिकाणी जमा करावा लागतो. सराव सत्र संपल्यानंत खेळाडूंना त्यांचा मोबाईल माघारी दिला जातो. चंद्रकांतच्या मते मोबाईलमुळे खेळावर त्यांचे दर्लक्ष होते. त्यांच्या या कडक शिस्तीचा परिणाम संघाच्या प्रदर्शनावर स्पष्टपणे दिसू लागाल आहे. मागच्या ६ वर्षांपासून मध्य प्रदेश संघ रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचू शकला नव्हता. पण यावर्षी संघ अंतिम सामना गाठत विजयी होण्याची करामत त्यांनी केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –