इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ हंगाम आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना आधी ७ वाजून ३० मिनिटांनी खेळला जाणार होता, पण आता वेळ बदलून ८ वाजता केली गेली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, आयपीएल अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, यावर्षी स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमामुळे अंतिम सामना ७.३० ऐवजी ८ वाजता सुरू केला जाणार आहे. अंतिम सामन्याच्या आधी ६ वाजून ३० मिनिटांनी हा कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम अंदाजे ५० मिनिटांमध्ये संपवला जाणार आहे, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कार्यक्रमासाठी अनेक बॉलिवुड अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित असणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी अनेक हंगामांमध्ये बीसीसीआयने आयपीएलचे सामने रात्री ८ वाजता सुरू केले आहेत. परंतु मागच्या हंगामातील कोरोना संकट आणि दुसऱ्या देशात स्पर्धा खेळवली गेल्यामुळे वेळापत्रकात बदल केला गेला आणि सामने ७.३० वाजता खेळवले जाऊ लागले. चालू हंगामात देखील रात्री ७.३० मिनिटांनी सामना सुरू केला जात आहे. याआधी ज्या दिवसी दोन सामने खेळले जाणार असतील, त्यादिवशी पहिला सामना ४ वाजता, तर दुसरा सामना ८ वाजता सुरू केला जायचा. तसेच ज्या दिवशी एक सामना खेळला जाणार असेल, तर तो सामना रात्री ८ वाजता सुरू केला जात असायचा. आता हिच जुनी वेळ आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यात देखील पुन्हा अंमलात आणली जाईल.
आयपीएलचा चालू हंगाम २६ मार्च रोजी सुरू झाला होता, पण उदघाटन समारंभाचे आयोजन केले गेले नव्हते. याच पार्श्वभूमीवर एपेक्स काउंसिलच्या बैठकीत शेवटच्या सामन्यादिवशी कार्यक्रम घेण्याचे ठरवले गेले. चालू हंगामातील साखळी फेरीतील सर्व सामने मुंबई आणि पुणे स्थित चार स्टेडियमवर खेळले गेले. आता प्लेऑफमधील सुरुवातीचे दोन सामने कोलकातामध्ये, तर अंतिम सामन्यासह शेवटचे दोन सामने अहमदाबादमध्ये खेळले जाणार आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! माजी भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धूंना तुरुंगवासाची शिक्षा
विराटकडून राशिद खानला खास गिफ्ट; भावाने Video व्हिडिओ शेअर करत मानले आभार