इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामापासून आयपीएलमध्ये खेळत आलेले संघ म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मंगळवारी (१२ एप्रिल) लढत सुरू आहे. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर हे संघ आयपीएल २०२२ मधील २२ वा सामना खेळण्यासाठी आमने सामने आले आहेत. आयपीएलच्या ४ वेळच्या विजेत्या सीएसके संघासाठी हा सामना अतिशय खास आहे.
सीएसकेचा (Chennai Super Kings) हा आयपीएलमधील विक्रमी २००वा सामना (CSK 200th IPL Match) आहे. या सामन्यापूर्वी १९९ सामन्यांमध्ये सीएसकेची कामगिरी अतिशय उल्लेखनीय राहिली आहे. १९९ सामने खेळताना सीएसकेने तब्बल ११७ सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, यातील अर्ध्यापेक्षा जास्त सीएसकेने एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वाखाली जिंकले आहेत. तर केवळ ८० सामने गमावले आहेत. परिणामी त्यांची विजयी टक्केवारी ५६.३४ टक्के इतकी राहिली आहे.
200* ᵗʰ #WhistlePodu for the Huddle in IPL!#CSKvRCB #Yellove 🦁💛 pic.twitter.com/y7qfLtr7xf
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 12, 2022
आयपीएलमध्ये सामन्यांचे द्विशतक करणारा सीएसके हा सहावा संघ बनला आहे. सीएसके २००८ पासूनच आयपीएलचा भाग आहे. मात्र सामन्यांचे द्विशतक करण्याबाबतीत हा संघ इतर संघांपेक्षा थोडा मागे पडला. कारण त्यांना २०१६, २०१७ मध्ये आयपीएलमधून बॅन करण्यात आले होते. तरीही त्यांच्यामध्ये सातत्य असल्याने त्यांनी या यादीत आपल्या नावाची भर घातली आहे.
या यादीत ५ वेळचा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स संघ अव्वलस्थानी आहे, ज्यांनी आतापर्यंत २२१ सामने खेळले आहेत. तर सीएसकेचा विरोधी संघ आरसीबीचा हा २१६ वा आयपीएल सामना होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स २१४ सामन्यांसह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पंजाब किंग्जने २०८ सामन्यांचा आकडा गाठला आहे.
आयपीएलमधील संघाचे सर्वाधिक सामने (Most Matches In IPL History)-
२२१ सामने- मुंबई इंडियन्स
२१६ सामने- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर*
२१४ सामने- कोलकाता नाईट रायडर्स
२१४ सामने- दिल्ली कॅपिटल्स
२०८ सामने- पंजाब किंग्ज
२०० सामने- चेन्नई सुपर किंग्ज*
नवा कर्णधार रविंद्र जडेजाच्या नेतृत्त्वाखाली सीएसकेला चालू हंगामात एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांनी आतापर्यंत ४ सामने खेळले असून त्यापैकी चारही सामने गमावले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपरजायंट्स, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांच्या हातून पराभव पत्कारला आहे. मात्र आता आरसीबीविरुद्धचा सामना सीएसकेसाठी अतिशय खास असल्यामुळे संघ हा सामना जिंकत विजयाचे खाते उघडतो की नाही?, हे पाहाणे रोमांचक ठरेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘धोनी ओपनिंग करून संघाला संकटातून काढू शकतो बाहेर’, माजी यष्टीरक्षक फलंदाजाचे मोठे विधान
‘बोल, कधी सोडतोय नोकरी’, हार्दिकची फिफ्टी झाल्यावर नोकरी सोडणार म्हटलेला कार्यकर्ता जोरात ट्रोल