---Advertisement---

टीम इंडियाची सुपरफॅन आजी आज पून्हा मैदानात!

On: शनिवार, जुलै 6, 2019 5:25 PM
---Advertisement---

आज(6 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध श्रीलंका संघात 44 वा सामना सुरु आहे. हेडिंग्ले स्टेडीयमवर होत असलेला हा सामना दोन्ही संघांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. या सामना पाहण्यासाठी स्टेडीयममध्ये उपस्थित असणाऱ्या 87 वर्षीय चारुलता पटेल यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या आधी 2 जूलैला भारत आणि बांगलादेश संघात झालेल्या सामना पाहण्यासाठी चारुलता स्टेडीयममध्ये उपस्थित राहिल्या होत्या. त्या सामन्यात त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. या सामन्यानंतर त्यांची खूद्द भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मानेही आवर्जून भेट घेतली होती.

तसेच विराटने त्यांना भारताच्या पुढील सामन्यांचेही तिकीटे उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते.

विराटने त्याचा हा शब्द पाळताना चारुलता यांना भारताच्या आजच्या सामन्याबरोबरच दोन्ही उपांत्य सामन्यांची आणि अंतिम सामन्याची तिकीटे उपलब्ध करुन दिली आहेत.

त्यामुळे आजही हेडिंग्ले स्टेडीयममध्ये चारुलता सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिल्या आहेत. आजचा सामना पाहतानाचा त्यांचा फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबरोबरच विराटने चारुलता यांच्यासाठी लिहीलेल्या संदेशाचा एक फोटोही बीसीसीआयने शेअर केला आहे.

फोटोंना कॅप्शन देताना बीसीसीआयने म्हटले आहे की ‘हॅलो चारुलता जी. भारताचा कर्णधार विराटने त्यांना सामन्याचे तिकीट देण्याचा शब्द दिला होता आणि त्यामुळे आज लीड्समध्ये आमची सुपरफॅन आमच्याबरोबर आहे.’

त्याचबरोबर विराटने चारुलता यांच्यासाठी संदेश लिहिला आहे की ‘आमच्या संघासाठी असणारे तूमचे प्रेम आणि आवड हे प्रेरणादायी आहे. मी आशा करतो की तूम्ही तूमच्या कुटुंबासमवेत सामन्याची मजा घ्याल.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीने मौन सोडले; निवृत्तीबद्दल केले मोठे भाष्य

श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाने केले दोन बदल, या खेळाडूंना मिळाली संधी

आज शेवटचा वनडे खेळणाऱ्या इम्रान ताहिरने दिला भावनिक संदेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment