प्रीमियर लीगमधील सामन्यात चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी यांच्या हातात सिगारेटचे पाकिट आढळले. अर्सेनल विरुद्धच्या सामन्यात हा प्रकार घडला. हा सामना चेल्सीने ३-२ने जिंकला.
सॅरी यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन असल्याने ते एका दिवसात सिगरेटची पाच पाकिटे ओढतात. काही दिवसांपूर्वीच ते हडर्सफिल्ड विरुद्धच्या सामन्यावेळी सिगारेट चावताना आढळले होते.
याबद्दल ट्विटरवर त्यांची चांगलीच खिल्ली उडविण्यात आली होती. तर या प्रकारामुळे ते परत एकदा नेटकऱ्यांचे शिकार झाले आहे.
“मी पुढील १-२ वर्षांसाठी हे व्यसन सोडणार आहे आणि मग परत सुरू करणार”, असे सॅरी म्हणाले.
‘धूम्रपान करण्यास मनाई असल्याने सॅरी आता सिगारेटच्या पाकिटाशी खेळत आहे’, अशा शब्दांत ट्विटरवर त्यांची टिंगल उडविण्यात आली आहे.
Sarri playing with a pack of cigarettes because he's not allowed to smoke them. 😂😂😂
— Formerly chelski_blues (@mfrayCFC) August 18, 2018
Sarri with a pack of cigs and fag in hand. pic.twitter.com/PsArl9l4Au
— mathew (@mdeeks76) August 18, 2018
Sarri holding a pack of fags on the bench 😂 #Chelsea #PremierLeague pic.twitter.com/685fQ2UBM5
— Ned Ozkasim (@nedoz9) August 18, 2018
२००७पासून इंग्लंड फुटबॉल असोसिएशनने मैदानावर धुम्रपान करण्यास मनाई असल्याचा नियम लागू केला आहे. पण सॅरी यांनी पुन्हा एकदा या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्या बद्दल कोणते निर्णय घेतले जातील हे पुढे कळेलच.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीतील ५ खास विक्रम
–केरळसाठी पाकिस्तान सुपर लीगमधील संघमालकाची मदत
–युरोच्या ‘प्लेयर ऑफ दी इयर’मध्ये मेस्सीचे नाव नाही?