पुण, १३ जुलै २०२३ : इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ च्या पहिल्याच सामन्यात रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. गतविजेत्या चेन्नई लायन्सने जेतेपद कायम राखण्याच्या दिशेने पाऊल टाकताना पहिल्याच सामन्यात पुणेरी पलटण टेबल टेनिस संघावर विजय मिळवला. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात गुरुवारी अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ ला आजपासून सुरुवात झाली.
चेन्नई लायन्सने सुरुवातीपासूनच दमदार खेळ केला आणि पुणेरी पलटण टेबल टेनिस संघावर १०-५ अशा विजयाची नोंद करून आश्वासक सुरुवात केली. पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात चेन्नई लायन्सचा अनुभवी खेळाडू अचंता शरत कमल याने ओमान अस्सारवर २-१ असा विजय मिळवून संघासाठी दोन महत्त्वाच्या गुणांची कमाई केली. भारताच्या दिग्गज खेळाडूने हा सामना ११-१०, ९-११, ११-६ असा जिंकला. आक्रमकता आणि अचूक फटके हे त्याच्या खेळाचे विशेष ठरले.
चेन्नई लायन्सच्या यांग्झी लियूने महिला एकेरीच्या लढतीत अर्चना कामथवर २-१ असा विजय मिळवून संघाची आघाडी ४-२ अशी मजबूत केली. ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने पहिले दोन गेम ११-५, ११-१० असे सहज जिंकले, परंतु अर्चनाने तिसऱ्या गेममध्ये १०-११ असा पलटवार केला. शरत/यांग्झी या जोडीने मिश्र दुहेरीत चेन्नई लायन्सला ३-० असा सहज विजय मिळवून दिला. या जोडीने ओमार/अर्चना यांचा ११-५, ११-८ आणि ११,२ असा सहज पराभव केला. दोघांनी आक्रमक खेळ करताना सुरुवातीपासूनच खेळावर पकड घेतली होती.
पुणेरी पलटण टेबल टेनिस संघाला मानुष शाहने विजयाची आशा दाखवली. चेन्नईच्या बेनेडिक्ट डुडाविरुद्ध त्याने कडवी झुंज दिली, परंतु चेन्नईच्या खेळाडूने २-१ ( ११-९, ११-७, ७-११) अशी बाजी मारली आणि इंडियन ऑइल टेबल टेनिस सीझन ४ मधील पहिली टाय जिंकली, जी DafaNews द्वारे गतविजेत्यांना समर्थित केली गेली.
अखेरच्या सामन्यात सुतिर्था मुखर्जी आणि हाना मॅटेलोव्हा यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली. हायाने पुणेरी पटलण टेबल टेनिस संघाला पहिला विजय मिळवून देताना सुतिर्थावर २-१ ( ११-६, ५-११, ११-२) असा विजय मिळवला. इंडियन ऑइल टेबल टेनिस सीझन ४ चे सर्व सामने स्पोर्ट्स १८ आणि जिओ सिनेमावर सायंकाळी ७.३० वाजल्यापासून प्रसारित होत आहेत आणि BookMyShowवर तिकिट्स उपलब्ध आहेत. (Chennai Lions’ winning debut in Ultimate Table Tennis Season 4)
महत्वाच्या बातम्या –
अमेरिकेत सुपर किंग्सला मिळालेला पाठिंबा पाहून भावूक झाला प्लेसिस; म्हणाला, “हे आमचे कुटुंब…”
पुन्हा उडणार ‘टी20 चॅम्पियन्स लीग’चा धुरळा! ‘या’ देशांतील संघ भरणार रंग