नुकताच आयपीएलचा मिनी लिलाव नुकताच कोचिन येथे पार पडला. या लिलावात बऱ्याच खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला, तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा आली. यावर्षी इंग्लंडला टी20 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार बेन स्टोक्स हा लिलावाच्या रिंगणात उतरलेला होता. 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईज वर बेेनने आपली नोंदणी केली होती.
बेन स्टोक्स (Ben Stokes) याला आपल्या संघात सामील करुन घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चढाओढ बघायला मिळाली, मात्र त्याची बोली 15 कोटीच्या पुढे गेल्यावर चेन्नई सुपर किंग्जने लिलावात उडी मारली. शेवटी सनरायझर्स आणि लखनऊ फ्रेंचायझींनी मागा घेतली आणि स्टोक्स 16.25 कोटींमध्ये चेन्नईच्या गोटात सामील झाला.
आयपीएलचा यंदाचा सोळावा हंगााम असणार आहे. लिलावात उतरलेल्या धाकड खेळाडूंना आपल्या संघात सामील करुन घेण्यासाठी फ्रेचांयझीमध्ये चढाओढ बघायला मिळाली. आता पर्यंत आयपीएलचे 15 हंगाम खेळवले गेले आहेत. मुंबई इंंडिन्स संघाने सर्वाधिक 5 वेळा आयपीएलचे जेेतेपद पटकावले आहे. त्याच्या खालोखाल चेन्नई सुपर किंग्ज संघाने 4 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली.
ही बातमी अपडेत होत आहे..
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेचा अष्टपैलू आयपीएलमध्ये घालणार धुमाकूळ, मिनी लिलावात पंजाबने केली ‘एवढ्या’ लाखांची उधळण
न भूतो! 18 कोटी 50 लाखांची बोली मिळवून सॅम करनने घडवला इतिहास; या संघाचा झाला भा