---Advertisement---

झिम्बाब्वेचा अष्टपैलू आयपीएलमध्ये घालणार धुमाकूळ, मिनी लिलावात पंजाबने केली ‘एवढ्या’ लाखांची उधळण

On: शुक्रवार, डिसेंबर 23, 2022 3:43 PM
Sikandar-Raza
---Advertisement---

केरळच्या कोची येथे शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) आयपीएल 2023चा मिनी लिलाव पार पडला. यामध्ये युवा खेळाडूंची चांदी झाल्याचे पाहायला मिळाले, तर काही अनुभवी खेळाडू अनसोल्ड ठरले. तसेच, काहींना तर मूळ किंमतीवरच समाधान मानावे लागले. यामध्ये झिम्बाब्वे संघाचा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा याचाही समावेश होता. रजाची अष्टपैलू कामगिरी पाहून त्याच्यावर सर्वाधिक बोली लागेल असे म्हटले जात होते, पण त्याला मूळ किंमती खरेदी करण्यात आले.

या मिनी लिलावात सिकंदर रझा (Sikandar Raza) याला पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने आपल्या ताफ्यात घेतेल. पंजाबने रझावर 50 लाख रुपयांची उधळण करत त्याला संघात सामील केले.

सिकंदर रझा हा यापूर्वी आयपीएलमध्ये खेळला नाहीये. त्यामुळे तो आयपीएल 2023 हंगामातून आपले आयपीएल पदार्पण करेल. त्याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने झिम्बाब्वेकडून 66 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 20.98च्या सरासरीने आणि 128.86च्या स्ट्राईक रेटने 1259 धावा केल्या आहेत. 87 ही त्याची यादरम्यानची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. याव्यतिरिक्त त्याच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने टी20त 7.18च्या इकॉनॉमी रेटने 38 विकेट्सही घेतल्या आहेत.

अशात सिंकदर रझाला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यानंतर तो काय कामगिरी करतो, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील. (cricketer Sikandar Raza goes to Punjab Kings for INR 50 Lakh rupees)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लॉटरी लागली ना राव! मयंक अरगवालची आयपीएलमध्ये चांदी, ‘एवढे’ कोटी घेत हैदराबादमध्ये सामील
मोठी बातमी! दीड कोटींचा नवखा इंग्लिशमन 13.25 कोटीत हैदराबादच्या चमूत; वाचा कोण आहे तो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---